जगाला भिकेला लावून चीनमध्ये फुटबॉल सामन्याचे आयोजन ?

    दिनांक  26-May-2020 15:24:11
|

football_1  H x
नवी दिल्ली : सध्या कोरोनामुळे जगभरात क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, अद्यापही काही ठिकाणी कुठलीही स्पर्धा चालू करण्यासाठी प्रत्येक देशाचे प्रशासन घाबरत आहे. याउलट आता चीनमध्ये ज्या शहरापासून कोरोणाच्या वादळाची सुरुवात झाली, त्या वूहान शहरामध्ये आता फुटबॉल सामन्याचे आयोजन होणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. एप्रिलमध्ये चीनमधून लॉकडाऊन उठवल्यानंतर आता वूहानमध्ये फुटबॉल सामन्यांची तयारी सुरु केली आहे.
 
 
वुहानमधील वॉंग जिजून या फुटबॉलपटूने सांगितले की, “एप्रिलपर्यंत आम्ही लॉकडाऊनमध्ये होतो. या काळात आम्ही घराबाहेर पडलोच नव्हतो. पण घरात राहून मी फुटबॉलचा सराव करत होतो. फिट राहण्यासाठी माझा व्यायामही सुरु होता. आता वुहानमध्ये फुटबॉलला सुरुवात होत आहे. माझ्यासाठी ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे. बऱ्याच दिवसांनंतर आम्ही मैदानात उतरणार आहोत. त्याचबरोबर सर्व मित्र आता आम्हाला भेटणार आहेत. त्यामुळे आमच्यासाठी ही गोष्ट आनंददायी आहे.”
 
 
एवढेच नव्हे तर आता चीनमधील खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठीही तयारी सुरु केली आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आम्ही सज्ज होत आहोत, असेदेखील या फुटबॉलपटूने सांगितले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला कोरोनाचे विष पाजून भिकेला लावणाऱ्या वूहान शहरामध्येच आता फुटबॉलचे सामने आयोजित होणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण काही महिन्यांपूर्वी अशाच एका सामन्यामधून जगाला कोरोनाची देणगी मिळाली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.