लॉकडाऊनमध्ये अक्षय कुमारने केले जाहिरातीची चित्रीकरण!

26 May 2020 16:49:35

akshay kumar_1  


केंद्र सरकारच्या कोरोना विषयी जागरुकता मोहिमसाठी अक्षय कुमारचा पुढाकार!


मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. कोणत्याही चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सध्या होत नाही. अशातच बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता एका जाहिरातीचे चित्रीकरण करत आहे. या चित्रीकरणाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत.


अक्षय कुमार करत असलेली जाहीरात केंद्र सरकारच्या कोरोना विषयी जागरुकता मोहिम राबवण्यासाठी चित्रीत केली जात आहे. कोरोना व्हायरसचा कोणत्याही प्रकारे फैलाव होणार नाही यासाठी जाहिरातीचे शूट करताना सेटवर योग्य ती काळजी घेतली जात आहे. या जाहिरातचे दिग्दर्शन अक्षय कुमारच्या 'पॅड मॅन' या चित्रपटाचे दिग्दर्शक आर. बाल्की करत आहेत. या जाहिरातीची निर्मिती बिल आणि मेलिंडस गेट्स यांच्या मेलिंडा फाउंडेशनच्या सहकार्याने केली जात आहे.


दोन महिन्यांनंतर अक्षय कुमार चित्रीकरणासाठी सेटवर अवतरला. अक्षय कुमारने कोरोनाविषयी बरीच जनजागृती केली आहे. कोरोनविषयक केंद्र सरकारच्या अनेक योजनांची माहिती त्याने सर्वसामान्यांना दिली आहे. आताही तो केंद्र सरकारच्या एका अभियानाच्या चित्रीकरणासाठी सेटवर आला. कमलीस्तान स्टुडियोमध्ये हे चित्रीकरण सुरू आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर आवश्यक असलेल्या सर्व नियमांचे पालन सेटवर करण्यात येत आहे. पोलीस आणि महानगरपालिकेची परवानगी घेऊन सामाजिक अंतर आणि योग्य ती काळजी घेऊन हे चित्रीकरण पार पडत आहे.
Powered By Sangraha 9.0