देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४१.५७ टक्क्यांवर पोहोचले

25 May 2020 20:08:39
Mumbai _1  H x


नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्यासह एकत्र येऊन केंद्र सरकारने आत्तापर्यंत विविध उपाययोजना केल्या आहेत. पूर्व नियोजित आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून अनेक पावले उचलण्यात आली. या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेले काही दिवस वाढत आहे. 

देशभरात आतापर्यंत एकूण ५७,७२० रुग्ण बरे झाले. २४ तासांत ३ हजार २८० रुग्ण बरे झाल्याची आकडेवारी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४१.५७ टक्के इतके आहे. देशभरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३८ हजार ८४५ इतकी पोहोचली आहे. ७७ हजार १०३ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.




Powered By Sangraha 9.0