कुलगाममध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा

25 May 2020 12:09:04

kulgam encounter_1 &
नवी दिल्ली : एकीकडे संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत असताना दुसरीकडे दहशतवादी कारवाया थांबायचे नाव घेत नाही आहेत. नुकतेच, जम्मू काश्मीरच्या कुलगाम सेक्टरमधील मंझगाम येथे सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या भागात एकूण ३ दहशतवादी लपले असल्याचे माहिती सुरक्षा दलाला मिळताच त्यांनी परिसराला घेरले आणि शोध मोहीम सुरू केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांना कुलगामच्या मंजगाम परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. या नंतर ३४ राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलिस बल आणि कुलगाम पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली. या परिसराला चारही बाजूंनी घेराव घालण्यात आला असून लपलेल्या दहशतवाद्यांना शोधानायचे कार्य सुरु आहे.
 
 
काही दिवसांपूर्वी जैशचा कमांडर रियाझ नायकू याला टिपले होते. त्यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले. भारतीय लष्कराच्या ५३ आरआर आणि बडगाम पोलिसांनी आखलेल्या संयुक्त अभियानांतर्गत लष्कर-ए-तोयबाच्या कटाचा भांडाफोड केला होता. सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या वसीम गनीसह तीन दहशतवाद्यांना पकडले होते. या व्यतिरिक्त शोध मोहिमेदरम्यान सुरक्षादलाने इतर तीन दहशतवाद्यांनाही पकडले होते.
 
Powered By Sangraha 9.0