खेळाडूंसाठी दिलासा ! खेलो इंडियाच्या २,७४९ खेळाडूंसाठी निधी जाहीर

25 May 2020 13:41:18

sports authority_1 &
नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरणाने खेलो इंडियाशी संबंधित २,७४९ खेळाडूंना ८.२५ कोटी रुपये भत्ता म्हणून जाहीर केला आहे. हे भत्ते २०२०-२१च्या पहिल्या तिमाहीतील आहेत. “२२ मे रोजी खेळाडूंच्या बँक खात्यात हा निधी पाठवण्यात आला. एकूण २,८९३ खेळाडूंना ही रक्कम दिली जाणार आहे. उर्वरित १४४ खेळाडूंना मेच्या अखेरीस हा निधी दिला जाणार आहे.” असे प्राधिकरणाने सांगितले आहे.
 
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, “या भत्त्यात त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रवासखर्च, घरी खाण्याचा खर्च आणि खेळाडूंकडून होणारा इतर खर्च यांचा समावेश आहे. प्रत्येक खेळाडूच्या खात्यात ३०,००० रुपये जमा केले आहेत. हे भत्ते ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील २१ क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना देण्यात आले आहेत.” या घोषणेमुळे बऱ्याच खेळाडूंना फायदा होणार आहे.
 
 
 
 
 
 
महाराष्ट्रातील सर्वाधिक ३८६ खेळाडूंना हा निधी मिळाला आहे. याशिवाय हरियाणाच्या ३८१, दिल्लीच्या २२५, पंजाबच्या २०२ आणि तामिळनाडूच्या १६५ खेळाडूंना हा निधी मिळाला आहे. प्रत्येक खेळाडूला दरवर्षी एक लाख २० हजार रुपये देण्याची तरतूद आहे. हा भत्ता खेलो इंडिया शिष्यवृत्तीचा एक भाग आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0