गायतोंडेचे वडील साकारणारे 'धुमाळ काका' पडद्याआड

25 May 2020 15:37:38

ramchandra dhumal_1 
मुंबई : मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचे सोमवारी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. अंदाजे त्यांनी १०० चित्रपटांमध्ये काम केले होते. हिंदीतील प्रसिद्ध ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सिरीजमध्ये गणेश गायतोंडेच्या वडिलांची भुमिका त्यांनी साकारली होती. एवढेच नव्हे तर फँड्री, ख्वाडा, सैराट यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
 
 
मराठीमध्ये त्यांना धुमाळ काका म्हणून सगळे ओळखायचे. वयाच्या उत्तरार्धात त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. छोट्या भूमिकांमधून त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक मराठी, हिंदी चित्रपट, वेब सीरिज व लघुपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मिडियावरून श्रद्धांजली वाहिली. रामचंद्र धुमाळ यांच्या पश्चात पत्नी आणि ३ मुळे असा परिवार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0