नेपाळचे चिनी वर्तन

    दिनांक  24-May-2020 23:01:45   
|

nepal india map_1 &nनेपाळ आणि भारत यांच्या खुल्या सीमा आहेत. येथे कोणतीही सीमा (वायर-कुंपण) नाही किंवा कोणतीही भिंत उभी राहिलेली नाही. केवळ स्तंभात बेस सीमांकन आहे, परंतु भारत आणि नेपाळमधील सीमा कालानुरूप अदृश्य होत आहे. दोन देशांच्या सीमेच्या मध्यभागी असलेली ’न मॅन्स लॅण्ड’ शेकडो लोकांनी ताब्यात घेतली आहे, ज्यामुळे भविष्यात दोन्ही देशांत वाद निर्माण होण्याची दाट शंका आहे.आपल्या शत्रूचा दुबळा शेजारी किंवा मित्र हा आपल्यासाठी सशक्त माध्यम ठरू शकतो. हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा किंबहुना दबावतंत्राचा महत्त्वाचा मंत्र आहे. भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पाकिस्तान आणि चीन ही भारताची कायम डोकेदुखी ठरली आहे आणि ती येणार्‍या काळातदेखील असणार आहे. याउलट आशिया खंडातील नेपाळ हा तसा सर्वार्थाने गरीब देश. भारताची नेपाळबाबतची भूमिका ही कायमच मित्रत्व आणि कमजोर लहान भावाला मदत करणे अशा प्रकारची राहिली आहे. मात्र, मागील काही काळापासून नेपाळ चीनच्या समोर कमरेत वाकल्याची अनेक उदाहरणे समोर आलीत. पुणे येथे संयुक्त लष्करी सरावात विमानतळावर दाखल झालेल्या नेपाळी सैन्याने चीनच्या सांगण्यावरून ‘पीछे मूड’ केल्याची घटना साधारण मागील वर्षी घडली. नेपाळला त्याच्या अस्तित्वाची आणि भारताच्या दृष्टीने त्याच्या महत्त्वाची जाणीवदेखील भारताने करून दिली. तेव्हा काही दिवस नेपाळ शांत होता.मात्र, आता पुन्हा नेपाळने आपले कर्तब दाखविण्यास सुरुवात केली आहे. नेपाळ व भारत यांच्या सीमेवर असलेल्या ‘नो मॅन्स लॅण्ड’वर नेपाळने अतिक्रमण केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे भारताशी असणार्‍या संबंधात नेपाळचे हे पाऊल निश्चितच त्रासदायक असेच म्हणावे लागेल. ‘नो मॅन लॅण्ड’वरही अतिक्रमण करणे हे चीनप्रमाणेच नेपाळचे कृत्य आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चीन ज्याप्रमाणे आपल्या नकाशात भारताच्या भागाचा समावेश करतो, भारताच्या सरहद्दीत अतिक्रमण करतो तसेच नेपाळचे हे कृत्य आहे. यावरून नेपाळचा हेतू स्पष्ट होण्यासदेखील मदत होत आहे. वन विभागाने आतापर्यंत केलेल्या चिन्हात नेपाळमधील ५००हून अधिक जणांनी ‘नो मॅन्स लॅण्ड’वर अतिक्रमण केल्याचे दिसून आले आहे. या अतिक्रमणाची व्याप्तीही आता दिवसागणिक वाढत आहे. नेपाळने गरबादर-लिपुलेख रोडला अतिक्रमण म्हटले आहे. नेपाळ आणि भारत यांच्या खुल्या सीमा आहेत. येथे कोणतीही सीमा (वायर-कुंपण) नाही किंवा कोणतीही भिंत उभी राहिलेली नाही. केवळ स्तंभात बेस सीमांकन आहे, परंतु भारत आणि नेपाळमधील सीमा कालानुरूप अदृश्य होत आहे. दोन देशांच्या सीमेच्या मध्यभागी असलेली ’न मॅन्स लॅण्ड’ शेकडो लोकांनी ताब्यात घेतली आहे, ज्यामुळे भविष्यात दोन्ही देशांत वाद निर्माण होण्याची दाट शंका आहे. याबाबत नेपाळच्या अधिकारी वर्गाला सर्व काही माहिती असूनदेखील त्यांनी मिठाची गुळणी घेतली असल्याचेच दिसून येत आहे.भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमा निश्चित करणारे अनेक खांब गायब झाले असून सीमा निश्चित करण्यासाठी, उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील ‘नो मॅन्स लॅण्ड’वर २४खांब बसविण्यात आले आहेत. हेच सीमा निश्चित करण्याचे एकमेव साधन आहे. येथे पाच मुख्य खांब आहेत तर १उप-खांब स्थापित केले आहेत. यापैकी सहा खांब गहाळ झाले असून २तोडण्यात आले आहेत. ज्यामुळे ‘नो मॅन्स लॅण्ड’च आता स्पष्ट होत नाही. यामुळे मोकळ्या सीमेवर अतिक्रमण होत असून यामुळे नेपाळ-भारत असा वाद होण्याचीदेखील शक्यता आहे. असे झाल्यास यात चीन नव्याने उडी घेऊन पाकऐवजी नेपाळचा वापर भारतविरोधी करण्याची शक्यता आहे. वर्षभरापूर्वी दोन्ही देशांच्या बैठकीत भारत आणि नेपाळमध्ये समान स्तंभ उभारण्याचे निश्चित झाले होते, परंतु अतिक्रमणामुळे हे प्रकरण कोल्ड स्टोअरेजमध्ये गेले.भारत-नेपाळच्या ‘नो मॅन्स लॅण्ड’वरील अतिक्रमणकर्त्यांची ओळख सुमारे दहा वर्षांपूर्वी झाली होती. ज्यामध्ये असे आढळून आले की, भारताच्या दिशेनेदेखील काही अतिक्रमण झाले आहे. मात्र, ते भारताने लागलीच काढून टाकले. तर नेपाळमधील पाचशेहून अधिक अतिक्रमणे आजही आहे तशीच आहेत. सध्या त्यांची संख्या वाढत आहे. या विषयावर दोन्ही देशांची २०१९मध्ये चर्चा झाली आहे. असे असूनही नेपाळने अतिक्रमण निर्मूलनासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. आपल्या पोशिंद्याचे आपणच ऐकवायचे नाही इतकी धमक नेपाळमध्ये नक्कीच नाही. कोणाचे तरी साहाय्य असल्याखेरीज नेपाळ हे धाडस करूच शकत नाही. आशिया खंडातील इतर राष्ट्रे ही नेपाळपासून दूर आहेत. केवळ चीनचे साहाय्य नेपाळला आहे, हे आजवर सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता नेपाळ चिनी नीतीचे अनुकरण करत आहे काय? असा प्रश्न यामुळे पुढे येत आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.