योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्या कामरानला एटीएसतर्फे अटक

24 May 2020 15:45:00
yogi_1  H x W:



 
 
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कामरान अमीन खान याला महाराष्ट्र एटीएसने शनिवारी रात्री इटक केली. कामरानला एटीएस पोलीसांनी मुंबई पूर्व उपनगरात चुनाट्टीतील म्हाडा कॉलनीतून अटक केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोशल मीडिया सेलला व्हॉट्सअॅपद्वारे ही धमकी दिल्याची कबुली त्याने दिली आहे.

 
शुक्रवारी त्याने एका मोबाईलद्वारे योगी आदित्यनाथ यांना एका बॉम्बस्फोटात उडवले जाईल, अशी धमकी दिली. या प्रकरणी लखनऊस्थित गोमती नगर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली. उत्तर प्रदेश टास्क फोर्सतर्फे या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. महाराष्ट्र एटीएस काळाचौकी युनीटला युपीए एसटीएफतर्फे ही माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

 
डंप डाटा आणि ह्यूमन इंटलिजन्सच्या मदतीने आरोपीचे ठिकाण शोधण्यात आले. ज्या फोनवरून धमकी दिली तो मोबाईल बंद ठेवण्यात आला होता. जसा हा फोन सुरू झाला तसा पोलीसांनी त्याचा शोध घेतला आणि उत्तर प्रदेश एसटीएफकडे सोपवण्यात आले. रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 
कामरान दक्षिण मुंबईतील नल बाजार येथील रहिवासी असून तो सध्या चुनाभट्टी येथे राहत होता. तिथे त्याच्या घराचे काम सुरू होते. झवेरी बाजारमध्ये यापूर्वी तो सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. २०१७मध्ये मणक्याची शस्त्रक्रीया झाल्यानंतर तो बेरोजगार झाला. त्याचे वडील टॅक्सी चालक होते, दोन महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात कामरानची आई आणि एक भाऊ व बहिण असा परिवार आहे.

 
कामरान ड्रग्ज सेवनही करायचा. उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ यांना मुस्लीम समुदायाचा शत्रू म्हणवत हत्येची धमकी दिली. उत्तर प्रदेश पोलीसांच्या ११२ मुख्यालयात गुरुवारी रात्री उशीरा १२.३० वाजता एक व्हॉट्सअॅप मेसेज आला होता. सोशल मीडिया डेस्क क्रमांकावर एक धमकीचा मेसेज आला होता. या प्रकारानंतर १० मिनिटांतच तक्रार दाखल करण्यात आली होती.




Powered By Sangraha 9.0