आणि सोनू सूद म्हणाला ‘आईला सांग, मी येतोय’

    दिनांक  23-May-2020 19:19:44
|

sonu sood_1  H
मुंबई : सध्या मुंबईमध्ये लॉकडाऊनमध्ये अडकलेले अनेक परगावी राहणारे कामगार स्वतःचे घर गाठण्यासाठी मिळेल तो पर्याय शोधत आहेत. अशामध्ये अभिनेता सोनू सूद याने एक पाउल पुढे टाकत हजारो मजुरांना घरी सोडण्यासाठी त्याने बससेवेची व्यवस्था केली आहे. मुंबईमध्ये अडकलेल्या उत्तरेतील मजुरांना घरी पोहचवण्यासाठी बस गाड्यांची व्यवस्था केली आहे.
 
 
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपटात खलनायकाची भूमिका बजावण्यात प्रसिद्ध असलेल्या सोनू सुदने या काळात अनेक कामगारांना आपल्या घरी पोहचण्यासाठी बस गाड्यांची सोय केली. काही दिवसांपूर्वी सोनूने मुंबईत अडकलेल्या कर्नाटकातील कामगारांना घरी जाण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेत १० बस गाड्यांची सोय केली होती. त्याच्या याच कामामुळे आता थेट सोशल नेटवर्किंगवरुन त्याला अनेकजण घरी पोहचवण्यासाठी मदत करण्याची विनंती करत आहेत.
 
 
 
 
 
अशाच एका परराज्यात अडकलेल्या विनोद कुमार नावाच्या व्यक्तीने सोनूला ट्विटवर टॅग करत “सोनू सर तुमची मदत हवी आहे. आम्हाला पूर्व उत्तर प्रदेशमधील कोणत्याही ठिकाणी पोहचवण्याची सोय करा तिथून आम्ही पायी चालत आमच्या गावी जाऊ सर,” अशा शब्दात मदत मागितली. सोनूनेही या व्यक्तीच्या ट्विटची दखल घेतली. मात्र त्याने दिलेला रिप्लाय सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे. आम्हाला उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भागात कुठेही उतरवा अशी मागणी करणाऱ्याला सोनूने, “चालत का जाणार मित्रा? नंबर पाठव तू” असा रिप्लाय दिला आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.