राज्यपाल- मुख्यमंत्री पिता-पुत्रांप्रमानेच : संजय राउत

    दिनांक  23-May-2020 14:00:06
|

sanjay raut_1  
मुंबई : शिवसेना खासदार संजय राउत यांनी शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. “राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत, खूप दिवस व्यक्तीशा भेटलो नव्हतो. बऱ्याच दिवसापासून भेट राहिली होती, त्यामुळे सदिच्छा भेट घेतली.” असे वक्तव्य संजय राऊत यांनी या भेटीनंतर केले. पुढे ते म्हणाले की, “राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध हे पिता-पुत्रांप्रमाणे आहेत.”
 
 
“राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. गेल्या काही खूप दिवसांपासून आमची भेट राहिली होती. ही एक सदिच्छा भेट आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंधही अत्यंत मधुर आहेत. दोघांना एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध जसे पिता-पुत्राचे असतात तसेच आहेत ते तसेच राहतील. आमच्यात कोणतीही दरी नाही,” असे यावेळी संजय राउत म्हणाले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.