मराठी चित्रपट महामंडळाला माधुरी दीक्षितचा मदतीचा हात!

    दिनांक  23-May-2020 15:32:07
|
madhuri dixit_1 &nbs


मुंबई : जागतिक कोरोना महामारीमुळे अडचणीत आलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला माधुरी दीक्षित यांनी मदतीचा हात दिला आहे. कोरोनामुळे असलेला लॉकडाऊन, ठप्प झालेली सिने इंडस्ट्री यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांची उपासमार चालू झाली. याचवेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने या सर्वांना आर्थिक वा अन्नधान्य किराणा कीट यास्वरुपात मदत चालू केली. आतापर्यंत २५०० सभासदांपर्यंत ही मदत पोहोच झाली आहे.


महामंडळाची सभासद संख्या ६००० पेक्षा जास्त असून या सर्व सभासदांना मदत करता यावी यासाठी मेघराज राजेभोसले- अध्यक्ष, पदाधिकारी व संचालकांनी समाजातील दानशूर व्यक्ती व बाँलीवूड स्टार्सना मदतीचे आवाहन केले होते. महामंडळाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला भरघोस मदत केली आहे व त्यामार्फत आपल्या व्यवसायातील कामगार, तंत्रज्ञ व कलावंतांचे दुःख काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी इतर कलावंतांना चित्रपट महामंडळाला मदत करण्याचे आवाहन ही केले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.