अरुण गवळीला न्यायलयाचा दणका

    दिनांक  22-May-2020 15:50:33
|
arun gavali _1  नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला न्यायालयाने दणका देत नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला. गवळीने पॅरोल वाढवून देण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला. मात्र, नागपूर खंडपीठाने त्याच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यास नकार दिला.


शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळी नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पत्नीच्या गंभीर आजारपणाचे कारण देत तो ४५ दिवसांसाठी पॅरोलवर बाहेर आला. २७ एप्रिलला त्याने कारागृहात हजर राहणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे त्याची पॅरोल १० मेपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतरही न्यायालयाने गवळीच्या मागणीनुसार त्याला २४ मे पर्यंत मुदतवाढ दिली. असे असूनही आणखी मुदतवाढ त्याने मागितली. 


नागपूर खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत त्याला मुदत वाढवून देण्यास नकार दिला. गवळीच्या वकीलांतर्फे पॅरोल वाढवून देण्यासाठी कोणतेही गैरकृत्य तसेच लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, न्यायालयाने चांगली वर्तवणूक किंवा नियमांचे उल्लंघन न केल्याच्या धर्तीवर पॅरोल वाढवला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.
दरम्यान, ८ मे रोजी योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांच्या विवाह पार पडला. यावेळी 'डॅडी' भावूक झाला होता. लॉकडाऊनमुळे नियम पाळत हा विवाह संपन्न झाला होता. मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीत हे लग्न संपन्न झाले होते.


Yogita Gawali _1 &nb
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.