फेसबूकचे ५० टक्के कर्मचारी पुढील १० वर्षे करणार वर्क फ्रॉम होम

22 May 2020 14:40:10
facebook _1  H






कॅलिफोर्निया : जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी मानल्या जाणाऱ्या फेसबूकने कोरोना महामारीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला. आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची परवानगी यापूर्वीच दिली होती. आता ५० टक्के कर्मचारी पुढील पाच ते दहा वर्षांसाठी घरबसल्याच काम करणार असल्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य म्हणून हा निर्णय घेण्यात आला. 

ऑफिस सुरू झाल्यानंतर केवळ २५ टक्के कर्मचारी कार्यालयात जातील. त्यांनाच तिथे काम करण्याची परवानगी असेल. जो कर्मचारी घरबसल्या काम करणार आहे, त्याला आपले लोकेशन द्यावे लागेल. वर्क फ्रॉम होम ही पद्धत एक जानेवारीनंतरही सुरूच राहील. कंपनीने यापूर्वीच सर्व कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले होते. 

एका वृत्तसंस्थेच्या अहावानुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या लोकेशनद्वारेच पगार मिळेल. जे कर्मचारी याचे पालन करणार नाहीत किंवा इमानदार नाहीत त्यांच्यासाठी गंभीर बदल करण्यात येणार आहेत. फेसबूक संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी एका लाईव्ह स्ट्रीमद्वारे ही उद्घोषणा केली आहे. 

झुकरबर्ग म्हणाले, "कंपनीने दूर्गम भागात राहणाऱ्यांसाठी यापूर्वी कधीही नोकरी देण्याचा विचार केला नव्हता. मात्र, लॉकडाऊनच्या काळात तसे करण्यास कुठलीही अडचण येणार नाही. पुढील काही दिवसांत फेसबूक काही अॅडव्हान्स इंजिनिअरींगसाठी कर्मचारी रुजू करू शकते."

मार्केट वॉच या संस्थेच्या अनुसार, 'कॅलिफोर्नियामध्ये मेनलो पार्क स्थित फेसबूक मुख्यालयाची किंमत ही २.४ दशलक्ष डॉलर इतकी आहे. फेसबूकच्या एका अंतर्गत सर्वेक्षणानुसार, कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आला होता जर त्यांना अन्य ठिकाणी जाऊन काम करण्याची संधी मिळाली तर त्यांची तयारी आहे का यावर ६० टक्के लोकांनी होकार दर्शवला होता.'



Powered By Sangraha 9.0