आरबीआयकडून रेपोरेट दरात कपात; कर्ज हफ्त्यांसाठी आणखी ३ महिने मुदतवाढ

22 May 2020 11:11:21

RBI_1  H x W: 0



रेपोरेट दरातील कपातीमुळे कर्जांचे हफ्ते होणार कमी


नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले. रेपो रेट कमी करण्याबरोबर कर्जदारांना त्यांनी मोठा दिलासा दिला.

रेपो रेट दरात ०.०४% कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. रेपो रेट दरात कपात करण्याच्या निर्णयामुळे देशभरातील अनेक कर्जदारांचे कर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरबीआयने रिवर्स रेपो रेटही कमी करत त्यात ३.३५% इतका केला आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या प्रमाणेच आता आरबीआयनेही प्रयत्न सुरु केला आहे.


सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचे ओझे वाढू नये यासाठी तीन महिने हफ्ते न भरण्याची मुभा देण्यात आली होती. ती मुदत आता आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. आधी मार्च, एप्रिल, मे साठी ही सवलत देण्यात आली होती. आता आणखी तीन महिन्यांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल. कर्जांवरील व्याज भरण्यास दिलेली स्थगिती आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आलेली आहे.
Powered By Sangraha 9.0