हुकुमशहा किम जोंग उन यांच्या बेपत्ता होण्यामागचे खरे कारण...

    दिनांक  22-May-2020 19:20:05
|

kim jong un_1  


मागील दोन महिन्यात कोरियन हुकूमशहा किम जोंग उन यांच्याबद्दल अनेक संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या समोर आल्या. पण आता ज्या बातम्या समोर येत आहेत त्यात असे म्हटले जात आहे की किम जोंग यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते सध्या उपचारावर लक्ष केंद्रित करत आहे. या कारणांमुळे त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून सामान्य लोकांपासून दूर राहिले.हुकुमशहा किम जोंग उन कुठे आहेत ?एप्रिलमध्ये वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात अनुपस्थितीमुळे त्यांच्याविषयीच्या अफवांना बळ मिळाले होते. एप्रिलमध्ये तीन आठवड्यांपासून ते बेपत्ता होते. तोपर्यंत त्यांच्या मृत्यू झाल्याच्या अफवांना देखील उधाण आले होते. पण १ मे रोजी किम जोंग उन यांनी एका कारखान्याच्या उद्घाटन सोहळ्यास हजेरी लावून या सर्व अफवांवर पूर्णविराम लागला. त्या कार्यक्रमानंतर ही किम पुन्हा कोणत्याही कार्यक्रमात दिसले नाही किंवा त्यांनी बाहेर येऊन जनतेला कोणताही संदेश दिला नाही. कोरोना विषाणूमुळे जगभरातील लोक त्रस्त असताना, कोट्यवधी लोक मरण पावले आहेत. आता पुन्हा एकदा त्याच्या तब्येतीबद्दलच्या चर्चाना सुरुवात झाली आहे. यामागील कारणे देखील सांगण्यात येत आहेत जी अगदी खरी असल्याचे स्पष्ट होते.


एका कोरियन तज्ज्ञाने असा दावा केला की किम जोंग आरोग्यविषयक मोठ्या समस्येला तोंड देत आहेत. किम जोंग उन ही समस्या जागापासून लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरिया युनिव्हर्सिटीमधील उत्तर कोरियन अभ्यासाचे प्राध्यापक नेम से ओंग-वूक यांनी या महिन्याच्या सुरूवातीस रॉयटर्सला सांगितले होते की ,किम जोंग उनसाठी आयोजित कार्यक्रमांमध्ये आता खुर्च्या आणि डेस्कची व्यवस्था केली जात आहे. यावरून हे लक्षात येत आहे की किम जास्त काळ उभे राहण्यास असमर्थ आहे. त्यांना जास्त अंतरावरुन चालणे शक्य नाही. या बातम्या भारतीय माध्यमांमध्येही दिल्या जात आहेत.


आरोग्यविषयक गंभीर समस्या ?


यापूर्वी कार्यक्रमांमध्ये किमसाठी या गोष्टी ठेवल्या जात नसत तरी ते या कार्यक्रमात सहभागी असत. पण आता ते कोणत्याही कार्यक्रमात सहभागी दिसत नाही. किमच्या यांनी आजाराशी सामना केला परंतु त्यांना काही शारीरिक समस्या उध्दभवल्या आहेत जसे कि ते जास्त काळ उभे राहू शकत नाही, थोड्या वेळासाठी उभे राहिल्यानंतर त्यांना बसावे लागते.नेम यांनी सांगितले की किम जास्त काळ उभे राहू शकत असते तर कदाचित एप्रिल महिन्यात कुमुसन पॅलेस येथे आयोजित वर्धापन दिन कार्यक्रमात उपस्थित राहू शकले असते. या कार्यक्रमात त्यांना कमीतकमी एक तास उभे रहावे लागले असते तो प्रोटोकॉलचा एक भाग होता. या कार्यक्रमात भाग न घेण्याविषयी बरीच चर्चा होत आहे. किमने या कार्यक्रमास हजेरी लावली नव्हती. उत्तर कोरियामध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, लोक याची प्रतीक्षा करत असतात. असे असूनही, त्यात किम जोंग उन यांचे सहभागी न होणं बर्‍याच गोष्टींचा विचार करण्यास भाग पाडत होते. १ मेच्या शोनंतर किम २१ दिवसांपासून पुन्हा बेपत्ता आहेत आणि आता उत्तर कोरियातील स्थानिक माध्यमे पुन्हा एकदा देशासमोर सकारात्मक चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु अनेक काही गंभीर गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

माध्यमातून सकारात्मक  प्रतिमा निर्मितीचा प्रयत्न 
या आठवड्याच्या सुरुवातीस किमबद्दल सकारात्मक प्रतिमा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रयत्न केला गेला, किम जोंग यांनी हे देशासाठी ३६५ दिवस करतात. ते कोणत्याही प्रकारची सुट्टी घेत नाही. ते रात्रभर जागे राहतात, त्यांची झोप पूर्ण होत नाही. उत्तर कोरियामधील दैनिक रोडॉंग सिनमून या दैनिकात किम बद्दल एक लेख प्रकाशित केला आहे की किम एक क्रांतिकारक नेता आहे, त्यांच्या दिनदर्शिकेत सुट्टी नाही, तो फक्त आणि फक्त कार्यरत राहतो.कोरियाच्या वर्कर्स पार्टीच्या सेंट्रल कमिटीच्या अधिकृत वृत्तपत्राचे संपूर्ण मुखपृष्ठ किम जोंग उन यांच्या कार्याला समर्पित केले गेले, ज्यात किम यांनी २०१२पासून केलेल्या सर्व कार्याचे वर्णन केले. हे संपूर्ण पृष्ठ केवळ किमचे देशातील नागरिकांबद्दल असलेल्या प्रेमाचे कौतुक केले आणि 'अभूतपूर्व प्रसंग' आणि 'भयानक परिस्थिती' असूनही त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि पुढे म्हटले की काही देशांनी राजधानी प्योंगयांगवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण आमच्या नेत्याने त्यांना प्रत्युत्तर दिले की तो कोणासमोर झुकणार नाही.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.