धारावी पुनर्विकासाचा निर्णय तात्काळ घ्यावा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2020
Total Views |
Dharavi  _1  H

 

मुंबई : कोरोनाने मुंबईत थैमान घातले असून धारावीला विशेष भयंकर फटका बसला आहे. धारावीत कोरोना रुग्णांचा आकडा इपाट्याने वाढतोय. धारावी आणि मुंबईतील झोपडपट्टीत फिजिकल डिस्टन्स पाळणे अशक्य आहे. धारावीचा पूनर्विकास वेळेत झाला असता तर करोनाने धारावीला आपल्या विळख्यात घेतले नसते, असे धारावीकरांचे मत आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हाच मुद्दा धरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे की, आता तरी धारावी पुनर्विकासाचा निर्णय तात्काळ घेऊन प्रत्यक्ष पूनर्विकासाला सुरुवात करावी.



धारावी पुनर्विकास निर्णय तात्काळ घेण्यात यावा, असे पत्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना नुकतेच दिले आहे. या पत्रात आव्हाड म्हणतात कि, मुंबईची कोविड कॅपिटल म्हणून धारावीची ओळख प्रस्तापित होऊ लागली आहे. हे धोकादायक आहे. कोरोनामुळे जी स्थित्यंतरे पहायला मिळाली आहेत. त्यातील प्रमुख स्थित्यंतर ह्या झोपड्पट्टीबहूल भागात दिसून आले आहे. धारावी सारख्या झोपडपट्ट्यामध्ये कोणत्याही दर्जाच्या आरोग्य वेवस्था नसल्यामुळे येथील उचार यंत्रणा पूर्णतः कोलमडून पडलेली दिसत आहे.



परिणामी सर्वसामन्यामध्ये धारावी बदल नकारात्मक भावना निर्मण झाली. त्यामुळेच आता धारावीच्या पुनर्विकासाएवढी सुंदर सामाजिक आर्थिक संधी महाविकास आघडीला मिळणार नाही, अशी सूचना आव्हाड यांनी मुख्यमंत्री याना केली आहे. धारावीच्या विकासाची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. केंद्रापासून राज्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया पार पडल्या आहेत. आजच्या स्थितीमध्ये कोरोनामुळे मुंबईचे अर्थकारण घसरले आहे. अशा स्थितीमध्ये धारावीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला.



किवा त्या संदर्भात घोषणा करण्यात आली. तर महाविकास आघाडीच्या दृष्टीने ते राजकीय सामाजिक आणि आर्थिक हिताचे ठरणार आहे. असे आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या राजकीय विरोधकांना सोशल इम्पॅक्टचा मोठा दणका आपल्याला देणे शक्य होणार आहे. बांधकाम उद्योग आहे कि,ज्याच्यामध्ये कितीही घसरण झाली तर बाहेरच्या विश्वातून निधी येतो. त्यामुळे ढासळलेल्या आर्थिक सामाजिक स्थर उंचावतानाच नवीन रोजगार निर्मिती देखील करता येणार आहे, अशी भूमिका आव्हाड यांनी मुख्यमंत्री यांच्या पुढे मांडली आहे.



धारावीसारख्या सर्व जाती धर्माच्या वस्तीच्या भागाचा विकास केल्यास तो विकास महाविकास आघाडी सरकारसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृश्ट्या हिताचे ठरणार आहे. याबाबतची संपूर्ण प्रक्रिया झाली असून आपण आपल्या स्तरावर एक बैठक आयोजित करून धारावी पुनर्विकस प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश द्यावेत,अशी विनंती आव्हाड यांनी मुख्यमंत्री ठाकरे याना केली आहे.



आधी आम्हाला वाचावा

धारावीत कोरोना रोगाने थैमान घातले आहे धारावीतील लोक कोरोना रोगामुळे मृत्युमुखी पडत आहे. आधी सरकारने आम्हाला वाचवले पाहिजे. यासाठी अधिकाधिक आरोग्य सेवा धारावीत उपलबद्ध करून दिली पाहिजे. रुग्णाचे जीव वाचवले पाहिजेत मगच पुनर्विकास करा, अशी विनंती धारावीकर सरकारला करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@