आम्ही डोमकावळे मग तुम्ही लबाड लांडगे का? : आशिष शेलार

22 May 2020 12:52:51

Ashish Shelar_1 &nbs
मुंबई : भाजपने शुक्रवारी महाराष्ट्र बचाव आंदोलनाची सुरुवात केली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात हे राज्य सरकार निष्क्रिय ठरले असून या सरकारला आता जाग आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेने आपल्या घराच्या अंगणात उभे राहुन सरकारच्या निष्क्रियते विरोधात काळे झेंडे, कोणत्याही काळ्या वस्त्राने निषेध व्यक्त करावा, असे भाजपकडून आवाहन करण्यात आले आहे. यावर शिवसेनेने टीका केल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.
 
 
 
 
 
 
भाजपवर टीका करताना ‘डोमकावळे’ असा उल्लेख केला होता. यावर आशिष शेलारांनी उत्तर देत, “आम्ही डोमकावळे तर तुम्ही लबाड लांडगे का ? असा पलटवार आशिष शेलार यांनी केला. ते म्हणाले, “दुसऱ्याच्या घरात रोज डोकावणाऱ्या पत्रपंडितांनी भाजपच्या आंदोलनावर भाष्य केले नसते तर आम्हालाच चुकल्यासारखे वाटले असते. आम्ही डोमकावळे तर तुम्ही कोण? लबाड लांडगे? सत्तेची फळे खायची, त्याच झाडाची मुळे खणायची! त्यांची अशीच गत व्हायची! आता बोलून नाही, महाराष्ट्रात करुन दाखवा!” असा टोला त्यांनी लगावला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0