‘रेडलाईट एरिया’ आणि संवेदना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2020   
Total Views |


red light area_1 &nb



जगात सगळे ऑलबेलअसतानाही तिचे काहीच ऑलबेलनसतेच. तर जगावर कोरोनाचे संकट असताना तिची परिस्थिती काय असेल? अर्थात, ती करत असलेला व्यवसाय समर्थनपर कधीच नाही. पण, ती माणूस आहे. कोरोना काळात तिच्या उदरनिर्वाहाचे काय झाले असेल? तिच्यावर अवलंबून असलेल्यांचे काय झाले असेल?



औरत ने जनम दिया मर्दोको

मर्दौ ने उसे बाजार दिया

तुलती हैं कही दिनारो मे

बिकती हैं कही बाजारों में

माणसांच्या दुनियेत माणूसच असलेल्या, पण देहविक्री करणार्‍या महिलांचे दु:ख शब्दातीत आहेत. जगातल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी मानवी सभ्यतेने नाकारलेले जगणे जगणारी ही देहविक्री करणारी स्त्री. जगात सगळे ऑलबेलअसतानाही तिचे काहीच ऑलबेलनसतेच. तर जगावर कोरोनाचे संकट असताना तिची परिस्थिती काय असेल? अर्थात, ती करत असलेला व्यवसाय समर्थनपर कधीच नाही. पण, ती माणूस आहे. कोरोना काळात तिच्या उदरनिर्वाहाचे काय झाले असेल? तिच्यावर अवलंबून असलेल्यांचे काय झाले असेल?



ज्यांच्या मनात अजूनही शाश्वत मानवी मूल्ये जागी आहेत आणि माणूस म्हणून ज्यांच्या संवेदना जाग्या आहेत
, ते सारेजण या प्रश्नांचा मागोवा घेत मदत करत आहेत. ग्लोबल नेटवर्क ऑफ सेक्स वर्क प्रोजेक्टआणि जॉईन्ट युनायटेड नेशन्स प्रोग्राम ऑन एचआयव्ही एड्सया दोन संस्थांनी मिळून जगातील सर्वच देशांना आवाहन विनंती केली आहे की, कोरोना लॉकडाऊनच्या काळात उद्योगधंदे ठप्प झालेल्या सर्वांना तुम्ही नक्कीच मदत कराल. पण, ही मदत देहविक्री करणार्‍या महिला आणि तृतीयपंथींनाही करा. कारण, तीही माणसंच आहेत. या पार्श्वभूमीवर सेक्स टुरिझमसाठी प्रसिद्ध असलेल्या थायलंड या देशामध्ये काय परिस्थिती असेल? थायलंडच्या अर्थव्यवस्थेमध्ये या टुरिझमचे मोठे योगदान आहे. मात्र, थायलंड नेहमीच आपली बाजू मांडताना सांगतो की, आमच्या देशात देहविक्री करणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. तरीही थायलंडमध्ये देहविक्री मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. यामध्ये देहविक्री करणार्‍या स्त्रिया, तृतीयपंथी आणि पुरूषांची संख्याही लक्षणीय आहे. हे सारे जण मोठ्या हौसेने हे सगळे करत असतील असे नाही. अज्ञान, शोषण आणि आत्यंतिक नाईलाज यामुळेच यातले बहुसंख्य इथपर्यंत पोहोचले असतील.



अधिकृत आकडेवारीनुसार कोरोनाच्या आपत्कालामुळे थायलंडमध्ये तीन लाख देहविक्री करणार्‍या स्त्रियांची स्थिती दयनीय झाली आहे. अर्थात
, तीन लाख हा आकडा हिमनगाचे टोक आहे. हा केवळ आभासी आकडा आहे. बरं या तीन लाख महिलांचा विचार केला तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांचीही उपासमार होतच असणार. थायलंडमध्ये जगभरातून लोक पर्यटनासाठी येतात. बहुसंख्य तर केवळ सेक्स टुरिझमउनभवण्यासाठी येतात. त्यांच्यामुळे थायलंडची अर्थव्यवस्था मजबूत होते. आता सारे जग कोरोनामुळे लॉकडाऊनआहे. परदेशी नागरिक थायलंडमध्ये येत नाहीत. पुढे किती दिवस हे प्रवासी येणार नाहीत याची काही माहिती नाही. त्यामुळे इथले सेक्स टुरिझमबंद आहे. अर्थात, ते बंद असल्याचे दु:ख नाही. प्रश्न आहे तो नाईलाजाने त्यावर पोट भरणार्‍यांचे काय होत असेल याचा. त्यातच थायलंडमध्ये रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत लॉकडाऊनआहे. एकंदरित इथल्या या व्यवसायाला चाप बसला आहे. हे चांगले की वाईट हा नीतिमत्तात्मक प्रश्न आहे.




तूर्त या व्यवसायात गुंतलेले कसे जगत असतील
? कारण, सभ्य जगाने त्यांच्याशी आणि त्यांनीही या जगाशी पूर्वीही सोशल डिस्टन्सिंगठेवलेले होतेच. आता या काळात त्यांच्या जगण्या-मरण्याचा कोण विचार करणार? थायलंडच्या इमपॉवरसंघटनेने थायलंडमधील देहविक्री करणार्‍या स्त्रियांची लॉकडाऊनकाळातली स्थिती यावर अभ्यास करून एक निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना काळात बंद पडलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांना सरकार आर्थिक पॅकेज देत आहे, तर देहविक्री व्यवसायात अडकलेल्यांनाही सरकारने तत्काळ पॅकेज जाहीर करावे. हे पॅकेज देहविक्री व्यवसायाला उभारी मिळावी म्हणून नव्हे, तर या व्यवसायात खितपत असलेल्या महिला आणि तृतीयपंथी जगावे म्हणून तरी जाहीर करावे. अर्थात, देहविक्री करणार्‍यांचा विषयही समाजाला नकोसा आहे. पण, जन्मल्यापासून देहविक्री करण्यापर्यंतचा तिचा/त्याचा प्रवास मानवतेला कलंकित करणारच असतो. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात या दुर्लक्षित आणि सर्वार्थाने वंचित घटकांचा विचार जगाने करायलाच हवा.


@@AUTHORINFO_V1@@