शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना सॅनिटरी पॅडवर जाहीरात करण्याची गरज काय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2020
Total Views |
sanitary pad _1 &nbs






मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातल्याने अभूतपूर्व संकटकालीन परिस्थिती ओढावली. सर्वात जास्त वाईट अवस्था मुंबईतील झोपडपट्टया आणि रुग्णालयांमध्ये आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या जखमांवर फूंकर घालताना राजकीय जाहिरातबाजीला मात्र, उत आला आहे. राज्याचे कॅबिनेटमंत्री आदित्य ठाकरे यांनी वाटप केलेल्या सॅनिटरी पॅडवर शिवसेनेची आणि स्वतःची जाहिरातबाजी केल्याचा प्रकार उघड झाला आहे.




दक्षिण मुंबईत कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण काही दिवसांपूर्वी वाढले आहे. अशातच नागरिकांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आले असून तिथल्या चाळी व इमारती सील करण्यात आल्या आहेत. तिथे मदत कार्य पोहोचवण्याची व्यवस्था सरकारतर्फे केली जात आहे. शिवसेना युवा कार्यकर्त्यांतर्फे कुलाबा परिसरात सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेद्वारे ५०० सॅनिटरी नॅपकीनचे वाटप झाले. परंतु या मदत साहित्यामधील सॅनिटरी नॅपकीनच्या पाकिटांवर युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना फोटो छापण्यात आला होता. यामुळे परिसरात चर्चेचा विषय झाला.




युवा सेनेकडून गरजूंसाठी या सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले होते. दरम्यान, याचे फोटो काही वेळात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मदत साहित्य, त्यातही सॅनिटरी नॅपकीनवर आदित्य ठाकरेंचा फोटो छापण्यात आल्याने त्यावर टीका करण्यात येत आहे. मदत करताना अशाप्रकाराची जाहिरातबाजी करणे गरजेचे आहे का? जाहिरातबाजी करण्याची ही वेळ आहे का, असा प्रश्नही संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे.



@@AUTHORINFO_V1@@