पगार कपात नाहीच उलट 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार 'बोनस' !

21 May 2020 15:03:42
1_1  H x W: 0 x




नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संकटातशी झुंज देत असताना अनेक व्यवासियाक आणि कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचा प्रस्ताव पुढील काही महिन्यांमध्ये ठेवलेला दिसत आहे. मात्र, हिंदूस्तान कॉम्प्युटर लिमिटेड या कंपनीने आपल्या दीड लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात कुठलीही कपात केलेली नाही. उलट गतवर्षीचा बोनसही कर्मचाऱ्यांना देणार असल्याची घोषणा केली आहे. २०१५ मध्ये या कंपनीने एकूण १५ हजार नव्या नोकऱ्या देणार असल्याचे जाहिर केले होते. मात्र, ही प्रक्रीया काहीशी मंदावली आहे. 


या प्रकरणी कंपनीला सद्यस्थितीला पाच हजार लोगांची गरज असल्याचे म्हटले आहे. कंपनीचे प्रकल्प रद्द झालेले नाहीत याला थोडासा वेळ लागू शकतो. लॉकडाऊननंतर सर्व काही सुरळीत सुरू झाल्यास कंपनीला एकूण पाच हजार लोकांची गरज भासू शकते, त्यासंदर्भात कर्मचारी नोंदणी सुरू आहे. कंपनीला सध्या उत्पादन आणि वाहतूक या दोन्ही समस्या आहेत. कंपनीला नव्या कर्मचाऱ्यांची गरज आहे. कोरोनाच्या सावटामुळे यात काहीशी दिरंगाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीबद्दल कंपनीने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी वर्षभर आपले काम करत असतात. त्यांना वर्षाअखेरीस मिळणारा बोनस ही त्यांची कमाई आहे. त्यामुळे मेहनतीची कमाई कर्मचाऱ्यांना मिळायलाच हवी. २००८ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीतही कंपनी याच भूमीकेवर ठाम राहिली होती.




Powered By Sangraha 9.0