अनुराग कश्यप करणार ‘फिल्म फेअर’ पुरस्काराचा लिलाव!

21 May 2020 15:32:36

Anurag_1  H x W


लिलावातून जमलेल्या पैशाने कोरोन टेस्ट कीट खरेदी केल्या जाणार!


मुंबई : देशातील कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धात बॉलिवूडकर सरकार आणि गरजू लोकांना जमेल तितकी मदत करत आहेत. यातच आता चित्रपट निर्माते दिग्दर्शक अनुराग कश्यप, लेखक वरुण ग्रोव्हर आणि कॉमेडियन कुणाल कामरा यांनी कोरोना व्हायरस टेस्ट किटसाठी निधी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.





या दिग्गजांनी एका मोहिमेअंतर्गत ३० दिवसांत १३ लाख ४४ हजार रुपये जमा करण्याचे नियोजन केले आहे. या रकमेतून कोरोना चाचणी किट खरेदी केल्या जाणार असून, त्या १ हजार लोकांची चाचणी करण्याच्या कामी येतील. यासाठी अनुराग कश्यप ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटासाठी मिळालेला पुरस्कार लिलाव करणार असल्याचे अनुरागने सोशल मीडियाद्वारे जाहीर केले. २०१३ साली ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटासाठी मिळालेली ‘फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्ड ट्रॉफी’ सर्वाधिक बोली लावणार्‍याला मिळणार असल्याचे त्याने ट्विट करत म्हंटले.


लेखक वरुण ग्रोव्हर त्याच्या एका ट्रॉफीचा लिलाव करणार आहे. कॉमेडियन कुणालने आपले यूट्यूब बटन लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री मानवी गागरूसुद्धा या उपक्रमात सामील झाले आहेत. जावेद यांनी त्यांच्या आवडत्या पुस्तकांपैकी एक‘इन वर्ड्स’ ची सही केलेली प्रत लिलावसाठी ठेवली आहे. तर, मानवी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान घातलेल्या ड्रेसचा लिलाव करणार आहे.
Powered By Sangraha 9.0