भारतीयांनी ठरवले तर 'टीकटॉक' हद्दपार होणार !

20 May 2020 15:05:10
tik tok _1  H x




मुंबई : सध्या झपाट्याने खाली आदळत असलेल्या टीकटॉकची गुगल अॅप रेटींगची चर्चा देशभरात होत आहे. नेटीझन्सनी टीकटॉक विरोधात मोहीम उघडल्याचा फायदा आता कंपनीलाही बसू शकतो. टीकटॉकची रेटींग अशाच प्रकारे घसरू लागली तर कंपनीला भारतातून गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्हे आहेत. कॅरी मिनाटी आणि आमिर सिद्दीकी यांच्यातील द्वंद्वयुद्ध आता राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न बनू लागला आहे. 

कोरोनाच्या संकटात सर्वच जण घरी आहेत. कोरोनाच्या सावटाची सुरुवात झाली त्यावेळी काही नेटीझन्सनी टीकटॉक वापरणे बंद करा, चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला, अशी मोहिम राबवली होती. त्यावेळी तितकासा प्रतिसाद या मोहिमेला मिळाला नाही. अनेकांच्या पसंतीस उतरलेल हे टीकटॉक अॅप सुरुवातीपासूच वादाचे कारण बनले आहे. यापूर्वी भारतात एकदा टीकटॉकवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच ती उठवण्यात आली. 

टीकटॉक विरुद्ध युट्यूब असा वाद हा टीकटॉकला चांगलाच महागात पडला आहे. आमिर सिद्दीकीने यापूर्वी युट्यूबर्स ना डिवचत एक व्हीडिओ तयार केला होता. कॅरी मिनाटी या युट्यूबरने त्याला रोस्टींग करत जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर त्याचा युट्यूबवरील व्हीडिओ डिलीट झाला. मात्र, कॅरी मिनाटीला पाठींबा देण्यासाठी युट्यूबरसह देशभरातील अनेक नेटीझन्सनी टीकटॉक विरोधात मोहिम उघडली. देशभरातून या मोहिमेला प्रचंड पाठींबा मिळाला आहे. टीकटॉकचे रेटींग अवघ्या एक स्टारवर येऊन पोहोचले आहे. दरम्यान, अशीच स्थिती राहिल्यास टीकटॉकला भारतातून गाशा गुंडाळावा लागेल की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. 
काही दिवासांपूर्वी टीकटॉक स्टार फैझल सिद्दीकीने अॅसिड हल्ल्याच्या उद्दातीकरणाचा व्हीडिओ शेअर केला होता. याची राष्ट्रीय़ महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. महिला आयोग अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राच्या डीजीपींना सिद्दीकीविरोधात कारवाई कठोर कारवाई करण्याची मागणी पत्र लिहून केली आहे.

Powered By Sangraha 9.0