राज्यात राष्ट्रपती राजवट हाच पर्याय ? : उद्धव ठाकरे, हीच ती वेळ : सुब्रमण्यम स्वामी

20 May 2020 13:28:30
swamy _1  H x W




काँग्रेस-राष्ट्रवादी सगळं संपवून टाकतील !


मुंबई : कोरोना संकटापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय महाराष्ट्रातील एकमेव मार्ग आहे का?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतातरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती तोडावी अन्यथा हे दोन्ही पक्ष तुमच्यासकट राज्यालाही संकटात आणतील, असे मत भाजप राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रातील हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री कारणीभूत असल्याचा रोख स्वामी यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. 

 
सुब्रमण्यम स्वामी यांनी हे विधान करत असताना याला एका लेखाचा संदर्भ दिला आहे. यात महाराष्ट्रातील वास्तव मांडण्यात आले आहे. कोरोनाची भारतातील रुग्णसंख्या एकूण लाखांवर पोहोचली आहे. त्यापैकी सुमारे ३३ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. मुंबईतील परिस्थिती याहूनही भयाण आहे. २० टक्के रुग्ण मुंबईतील आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात परिस्थिती हाताळण्यासाठी पूरेपूर प्रयत्न केले परंतू, प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र सरकार कमी पडले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जिथे जगभरातून पर्यटक, नोकरदार आणि उद्योजक येत असतात त्या दृष्टीकोनातून प्रतिबंधात्मक कारवाई आणि उपाययोजना होऊ न शकल्याने हा फैलाव झाला आहे. राज्यातील वाहतूक नियंत्रण, नागरिकांना संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षित ठेवण्यासाठी खबरदारी न घेण्यात आल्याचा ठपका संबंधित लेखात ठेवण्यात आला आहे. 



राज्यातील परिस्थितीवर नियंत्रणात राहिली नाही तर राष्ट्रपती राजवट हाच पर्याय आहे, असा या लेखाचा ओघ आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनीही या प्रकरणी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. राज्य सरकारमधून उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडण्याची हीच वेळ आहे, अन्यथा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष त्यांच्यासकट सर्व संपवून टाकतील, त्यामुळे आता नाही तर कधीच नाही, असा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.





Powered By Sangraha 9.0