लॉकडाऊनमुळे पनवेलमध्ये अडकलेल्या सलमानने घेतली आईवडिलांची भेट!

    दिनांक  20-May-2020 13:50:48
|

salman khan_1  काही तास थांबून, मदत कार्याचा आढावा घेऊन पुन्हा गाठले पनवेल


मुंबई : लॉकडाऊनमुळे मागील ६० दिवसांपासून पनवेलमधील आपल्या फार्महाऊसमध्ये अडकलेला सलमान खान मंगळवारी मुंबईत पोहोचला. मुंबईला येत असताना सलमानने आवश्यत ती सर्व काळजी घेतली. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला असलेल्या आपल्या आईवडिलांची त्याने भेट घेतली आणि त्यानंतर तो पनवेलला रवाना झाला.


आईवडिलांची भेट घेण्यासोबतच कोरोनाव्हायरस साथीच्या काळात मुंबईत त्याच्या वडिलांच्या मदतकार्यात काही अडथळा तर येत नाहीये ना, याचा आढावा घेण्यासाठीही तो मुंबईत आला होता. सलमानने पालकांना भेटण्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली होती. त्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले आणि काही तास आईवडिलांसोबत घालवून तो रात्री पनवेलला परत गेला.


सलमानसह त्याची बहीण अर्पिता, मेहुणे आयुष शर्मा, पुतण्या निर्वाण, मैत्रिणी जॅकलिन फर्नांडिज, वलुष्चा डिसोझा आणि युलिया वंतूर हे देखील पनवेलमध्ये अडकले आहेत. सलमानने एका बातचीतमध्ये सांगितले होते की, तो दिवसांसाठी पनवेलमध्ये गेला होता, पण त्याच काळात लॉकडाऊनची घोषणा झाली आणि तो मुंबईत परतू शकला नव्हता. पनवेलमध्ये राहून सलमान तिथल्या लोकांना मदत करत आहे. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.