भारताचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन स्वीकारणार ‘WHO’ च्या कार्यकारी बोर्डाचे अध्यक्षपद!

20 May 2020 12:21:02

dr. Harsh Vardhan_1 


२२ मे रोजी डॉ. हर्ष वर्धन पदभार स्वीकारण्याची शक्यता!


नवी दिल्ली : कोरोना विरोधातील लढ्यात नेतृत्व करणारे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आता लवकरच जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाले आहेत. २२ मे पासून डॉ. हर्ष वर्धन जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.


डॉ. हर्ष वर्धन जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी यांची जागा घेतील, सध्या ते ३४ सदस्यीय मंडळाचे अध्यक्ष आहेत. मंगळवारी जागतिक आरोग्य असेंब्लीच्या १९४ देशांनी या जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.


गेल्या वर्षी दक्षिण-पूर्व आशिया समूहाने निर्णय घेतला होता की, या वेळी मंडळाचा अध्यक्ष भारताचा असेल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हर्ष वर्धन हे २२ मे रोजी आपला पदभार संभाळतील. हे पद दरवर्षी बदलते आणि गेल्या वर्षी भारत पहिल्या वर्षी या मंडळाचे प्रतिनिधित्व करेल असा निर्णय घेण्यात आला.


आरोग्य क्षेत्रातील केवळ ३४ देशांनाच कार्यकारी मंडळाचे सदस्य बनवले जाते. मात्र यंदा मागास देशांनाही यात सहभागी करण्यात आले आहे. भारताव्यतिरिक्त यावेळी बोत्सवाना, कोलंबिया, घाना, गिनी-बिसाऊ, मेडागास्कर, ओमान, रिपब्लिक ऑफ कोरिया, रशिया आणि ब्रिटन यांना या मंडळाचे सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0