गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून हिंसाचार; रेती वाहतूक करणारे ३ ट्रक पेटवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2020
Total Views |

gadchiroli_1  H



पोलिस चकमकीमध्ये नक्षली नेता ठार झाल्याच्या निषेधार्थ नाक्षावाद्यांकडून आज बंदची घोषणा


गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून पोलिस चकमकीमध्ये नक्षली नेता सृजनाक्का ठार झाल्याच्या निषेधार्थ आज बंदची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान रात्री उशिरा गडचिरोलीमध्ये धानोरा परिसरात राष्ट्रीय महामार्गावर छत्तिसगड मधून रेती वाहतूक करणार्‍या ३ ट्रक नक्षलवाद्यांकडून पेटवण्यात आले. काही दिवसांपूर्वी अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांनी पत्रके टाकून आजच्या गडचिरोली बंदची माहिती दिली होती.


मंगळवारी राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या खाजगी कंत्राटदाराचे ट्रक थांबवून त्यामधील लोकांना हुसकावून लावले. त्यानंतर वाहनांना आग लावण्यात आली. यावेळी टायर फुटल्यानंतर मोठा आवाज झाला. धुराचे लोट पहायला मिळाले. यामुळे काही काळ स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.


१७ मे दिवशी भमरागड मध्ये लदंडी-गुंडूरवाही जवळ असणार्‍या जंगलात सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणला होता. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने आणि शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले होते. दरम्यान चकमकीमध्ये काही नक्षलवादीदेखील ठार झाले होते.
@@AUTHORINFO_V1@@