२५ मेपासून देशांतर्गत विमानवाहतूक टप्प्याटप्य्याने सुरु होणार

20 May 2020 20:27:01

domestic flights_1 &




नवी दिल्ली
: देशांतर्गत विमान वाहतूक येत्या २५ मेपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. सर्व विमानतळांना वाहतुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर देशांतर्गत विमान वाहतूक सुरू होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पण विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढचे काही महिनेतरी कमीत कमी समान घेऊन जावे लागणार आहे. म्हणजे फक्त एकच बॅग न्यावी लागेल. तसेच विमान तळावर प्रवासाच्या काही तास आधीच पोहोचावे लागेल. तपासणीसाठी प्रवाशांना ठरवून दिलेल्या नियमातच उभे राहावे लागेल. विमानात चढण्यापूर्वी आणि उतरल्यानंतर प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल.


आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी कायम

सद्यस्थितीत केवळ देशांतर्गत उड्डाणेच चालविली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी कायम आहे. देशात २०विमानतळ आहेत जिथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालविली जातात. जगभरात कोरोनाचा चढता आलेख पाहता आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.






मागील आठवड्यातच जारी केली मार्गदर्शकतत्त्वे

नागरी उड्डयन मंत्रालयाने एक आठवड्यापूर्वीच मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) जारी केल्या. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रवाशांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते सांगण्यात आले. याशिवाय प्रशासनासाठी मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या. एसओपीच्या तपासणीत विमानामध्ये फक्त एक बॅग नेण्यास परवानगी, विमानात कोणतीही बॅग किंवा वस्तू घेऊन जाण्याची परवानगी नाही. अशा मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश होता. याशिवाय आरोग्य सेतु अँप अनिवार्य आहे. कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट आणि वेब चेक-इन परिधान करावे लागेल आणि प्रवाशांनाही मास्क, ग्लोव्हज, शूज, पीपीई किट इत्यादी घालावे लागतील. विमानातील पुढील तीन जागा वैद्यकीय आपत्कालीन प्रवाश्यांसाठी राखीव ठेवल्या पाहिजेत.
Powered By Sangraha 9.0