अखेर किम जोंग जगासमोर...

02 May 2020 11:00:43

Kim Jong Un_1  
नवी दिल्ली : जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असताना जगामध्ये आणखी एक गोष्ट सर्वांना खटकत होती. ती म्हणजे उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग-उन यांचे गायब होणे. अनेकदा त्यांच्या मृत्युच्या अफवाही समोर आल्या. अखेर यावर पडदा टाकत त्यांनी तब्बल २० दिवसानंतर सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावल्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. उत्तर कोरियातील माध्यानांनी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
 
 
एका रासायनिक खत कारखान्याच्या उद्धाटनाला किम यांनी शुक्रवारी हजेरी लावली, असे कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने (केसीएनए) वृत्त दिले आहे. अनेक दिवसानंतर सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी त्यांची बहिण किम यो जोंगही उपस्थित होत्या. सुनचाँन फॉस्फेटिक फर्टिलायझर' या कारखान्याचे जागतिक कामगार दिनी उद्घाटन करण्यात आले, असे स्थानिक वृत्त वाहिनने म्हटले आहे.
 
 
प्रकृती गंभीर असल्याच्या अफवा?
 
 
किम जोंग उन यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त मागील काही दिवसांपासून गाजत आहे. याबाबत दक्षिण कोरियाने वृत्त दिले होते. चीनमधून एक वैद्यकीय पथक उत्तर कोरियाला किम यांच्या उपचारासाठी आले असल्याच्याही अफवा पसरली होती. त्यांना हृद्यविकाराचा त्रास असून प्रकृती ठीक नसल्याचे वृत जगभरातील माध्यमांतून येत होते. त्यांच्या मृत्यू झाल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. मात्र, आता त्यांनी कार्यक्रमाल हजेरी लावल्याचे वृत्त समोर आले आहे.
Powered By Sangraha 9.0