रामायण, महाभारतात ‘आर्य’

    दिनांक  02-May-2020 22:42:36
|


arya_1  H x W:
आर्यशब्दाच्या अर्थाच्या विविध छटा मागच्या लेखात आपण पाहिल्या. तसेच आर्य आणि दस्यु या शब्दप्रयोगांचे वैदिक साहित्यातले काही दाखले सुद्धा आपण पाहिले. ही उद्धरणे प्रत्यक्ष वैदिक संहितेतली असल्यामुळे सर्वात प्राचीन झाली. परंतु पुढच्या उत्तरकालीन संस्कृत साहित्यात सुद्धा आर्यशब्द कुठे आढळतो का, असल्यास कोणत्या अर्थाने येतो, याचा आता एक धावता आढावा घेऊ.
वाल्मीकी रामायणात
आर्य


रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्ये ऋषींनी
रचलेलीआहेत, वेदांच्या मंत्रांप्रमाणे ती त्यांना दिसलेलीअथवा स्फुरलेलीनाहीत. त्यामुळे यांना आर्ष (ऋषींनी रचलेली) महाकाव्येम्हणतात. रामायणात आणि महाभारतात देखील आर्यशब्दाचे असंख्य उल्लेख दिसतात. मागे दाखवून दिल्याप्रमाणे आर्य शब्द सद्गुणांचा वाचक असल्यामुळे कोणत्याही आदरणीय, वंदनीय, सद्गुणी व्यक्तीचा उल्लेख करताना पुरुष असेल तर आर्यआणि स्त्री असेल तर आर्याअसेच म्हणण्याचा तत्कालीन प्रघात दिसतो. रामायणात पहिल्याच बालकाण्डातील पहिल्याच सर्गात (अध्यायात) हा शब्द दोनदा आलेला दिसतो, इतका त्याचा ठायी ठायी मुबलक वापर झालेला आहे. यामध्ये देवर्षी नारदमुनी महर्षी वाल्मीकींना रामकथा थोडक्यात सांगत आहेत. त्यात श्रीरामांचे वर्णन करताना नारद म्हणतात, सर्वदाभिगतः सद्‌भिः समुद्र इव सिन्धुभिः । आर्य: सर्वसमश्चैव सदैक: प्रियदर्शनः || वाल्मीकिरामायण १.१.१६ || अर्थात नद्या जशा समुद्राकडे जातात, तसे सज्जन लोक रामाकडे येतात. राम आर्यअर्थात सद्गुणी असून सर्वांच्या ठिकाणी समभाव ठेवणारा आहे. म्हणून सर्वांना त्याचे दर्शन नेहमीच प्रिय वाटते.
रामायणात रामाचे वर्णन
आर्यम्हणून केलेले आहे, त्यात फारसे विशेष काही नाही. परंतु वनांत आणि डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या वानरांनासुद्धा रामायणात आर्यम्हटले गेले आहे! पहा वाल्मीकी रामायणाच्या किष्किंधाकाण्डात काय वर्णन सापडते ते. रामाने किष्किन्धेचा अधर्मी राजा वाली याचा वध केल्यावर त्याची पत्नी तारा शोक करते. सुप्त्वैव पुनरुत्थाय आर्यपुत्रेति क्रोशती । रुरोद सा पतिं दृष्ट्‍वा संदितं मृत्युदामभिः || वाल्मीकिरामायण ४.१९.२७ || अर्थ : “(वालीला पाहताच) ती अचानक झोपेतून उठल्याप्रमाणे हे आर्यपुत्रम्हणून मृत्युच्या पाशाने बांधलेल्या पतीकडे पाहून आक्रोश करायला लागली.पहा, ‘वानरअसलेल्या वालीची पत्नी वानरीतारा आपल्या पतीला चक्क आर्यपुत्रम्हणते! अशी ती विलाप करत असताना बाजूलाच तापस वेशातल्या रामास पाहून ती त्यांच्याकडे जाऊ लागते. त्या प्रसंगाचे वर्णन करताना वाल्मीकी म्हणतात, तस्येंद्रकल्पस्य दुरासदस्य महानुभावस्य समीपमार्या । आर्ताऽतितूर्णं व्यसनं प्रपन्ना जगाम तारा परिविह्वलन्ती || वाल्मीकिरामायण ४.२४.२९ || अर्थ: त्या वेळी संकटात अडकलेली ती शोकमग्न आर्या ताराअत्यंत आर्त होऊन अजेय वीर महानुभाव श्रीरामाच्या जवळ गेली.आता इथे तर महर्षी वाल्मीकी त्या वानरी तारेला सुद्धा आर्याम्हणत आहेत! त्यानंतर वालीच्या देहाचा अंत्यसंस्कार करण्याची सूचना देताना त्याचा भाऊ सुग्रीवम्हणतो, आज्ञापयत् तदा राजा सुग्रीवः प्लवगेश्वरः।और्ध्वदैहिकमार्यस्य क्रियतामनुकूलतः || वाल्मीकिरामायण ४.२५.३० || अर्थ: त्यानंतर वानरांचा राजा सुग्रीवाने आज्ञा दिली, की आर्यवालीचे और्ध्वदैहिक संस्कार विधिपूर्वक संपन्न करावेत.इथे तर वानरराज सुग्रीव सुद्धा स्वत:च्या वानर भावाला आर्यम्हणतो! रामायणात इतरत्र हनुमान आणि जांबुवंत यांनाही आर्यम्हटल्याचे उल्लेख आहेत.
कुठे आले हे किष्किंधेचे राज्य
? तत्कालीन किष्किंधा म्हणजे मध्ययुगीन काळातील विजयनगरराज्याचा परिसर आणि आजचे कर्नाटकातले हम्पीआणि त्याच्या आजूबाजूचा परिसर! म्हणजेच आपला दक्षिण भारतातला द्रविडप्रदेश!! पंजाबातला कुठला सिंधू किंवा सरस्वती नदीच्या काठचा नाही. पण इथे तर हे लोक एकमेकांना आर्यम्हणताना दिसत आहेत, ‘द्रविडनाही!!! मग हे म्हणणारे वानरराणी तारा, तिचा पती वाली, त्याचा भाऊ सुग्रीव हे सगळे वानरइसवी सनपूर्व १८०० मध्ये मध्य-आशियातून भटकत सिंधूनदीच्या काठी आलेल्या तथाकथित आर्यांच्याटोळक्यातले होते की काय? त्यांच्या काळी पाश्चात्त्य संशोधकांनी प्रकाशित केलेला हा इतिहास उपलब्ध नव्हता ना, म्हणूनच बहुतेक त्यांचे हे अज्ञानअसावे!
हे सगळे कमी की काय
, म्हणून तिकडे दूर दक्षिणेत लंकानगरीत सुद्धा राक्षसांचा राजा रावण आपल्या पत्नीला आर्याम्हणतो. रावणाच्या सर्व बायका त्याला आर्यपुत्रम्हणतात! त्यांच्या दृष्टीने तो थोरच, म्हणून आर्यपुत्र’!! युद्धात रामाच्या हातून रावणाचा वध झाल्यावर या सगळ्या बायका शोक करू लागल्या. या प्रसंगाचे वर्णन करताना वाल्मीकी म्हणतात, आर्यपुत्रेति वादिन्यो हा नाथेति च सर्वशः । परिपेतुः कबन्धाङ्‌कां महीं शोणितकर्दमाम् || वाल्मीकिरामायण ६.११०.४ || अर्थ : हे आर्यपुत्र, हे नाथ, असा आक्रोश करीत त्या सगळ्या जिथे बिना मुंडक्यांची प्रेते पडलेली होती आणि रक्ताचा चिखल झालेला होता, अशा त्या युद्धभूमीमध्ये (रावणाला शोधत) फिरू लागल्या.आता ही लंका म्हणजे तर भारताच्याही दक्षिणेला! तिथेही रावण आर्यच!! म्हणजे भारताच्या वायव्येकडून आलेल्या या तथाकथित आर्यांनीदक्षिणेत इतक्या खाली पार लंकेपर्यंत मजल मारली की काय? हा इतिहास तेवढा युरोपीय विद्वानांच्या आणि त्यांचीच रीओढणाऱ्या काही भारतीय अभ्यासकांच्या नजरेतून मात्र सुटलेला दिसतो! रावणाला मूलनिवासी मानून जय रावणम्हणून घोषणा देत आज भारतातल्या विविध विद्यापीठांमध्ये आंदोलने करणाऱ्यांचा हा रावणस्वत: मात्र चक्क आगंतुक, आक्रमक आणि उपरा आर्यचनिघाला!!महाभारतात
आर्य


जी गोष्ट रामायणाची
, तीच महाभारताचीही. महाभारताच्या एकंदर लाखभर श्लोकांत आर्यशब्द असंख्य वेळा येतो. यातील उदाहरणे द्यावीत तितकी थोडीच! एवढे मोठ्या आकाराचे महाकाव्य आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी असेलच असे नाही. पण त्यातला सातशे श्लोकांचा एक विशिष्ट अंश म्हणजे भगवद्गीता’ – हा ग्रंथ तर बहुतेक प्रत्येक हिंदूच्या घरात असतोच. त्यातलेच एक उदाहरण पाहू. युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनाच्या मनात आपण आपल्याच सग्यासोयऱ्यांना मारून शेवटी काय मिळवणार आहोत? त्यापेक्षा हे युद्धच नकोअसा भ्रम उत्पन्न झाला. त्यावर भगवान श्रीकृष्णांनी त्याची खरडपट्टी काढत त्याला सुनावले, कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् । अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन || भगवद्गीता २.२, महाभारत ६.२६.२ || अर्थ: हे अर्जुना, अशा भलत्या वेळी हा मोह तुला कशामुळे झाला? कारण आर्य’ (श्रेष्ठ लोक) याचे आचरण करत नाहीत, याने स्वर्ग प्राप्तीही होत नाही आणि कीर्ति पण मिळत नाही.इथेही आर्य शब्द गुणवाचकच दिसतो. अशी अजून अनेक उदाहरणे देता येणे शक्य आहे. परंतु विस्तारभयास्तव ते वाढवीत नाही. पण रामायण असो की महाभारत, त्यात आर्यशब्द गुणवाचक अर्थानेच आलेला दिसतो, वंशवाचक नाही - हे स्फटिकाइतके स्वच्छ तथ्य आहे! मग मागच्या एका लेखात दाखवून दिल्याप्रमाणे पाश्चात्त्यांनी खोडसाळपणाने भारतीयांच्या शब्दकोशात त्यासाठी कितीही छेडछाड केलेली असो, त्याने मूळ तथ्य बदलत नाही.


(
क्रमश:)

- वासुदेव बिडवे

(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान - अर्थात 'भारतविद्या' अथवा 'प्राच्यविद्या' (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.