बालपणीचं प्रेम ते दुसरं लग्न; नवाजुद्दीनची अशीही एक वादग्रस्त बाजू...

    दिनांक  19-May-2020 14:28:58
|

nawaz_1  H x W:


अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीच्या पत्नीची घटस्फोटाची मागणी!

मुंबई : बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी आज वयाच्या ४७ व्या वर्षात पदार्पण करतोय. नवाजच्या कारकीर्दीची सुरूवात सरफरोश आणि शूलसारख्या चित्रपटांमधील छोट्या छोट्या पात्रांमधून झाली होती, परंतु त्याच्या पात्रांपेक्षा सध्या चर्चेत आलंय ते त्याच खासगी आयुष्य. कधी कोणी त्याच्या वॉचमन नोकरीची कथा सांगतं, तर कधी त्याच्या चित्रपटांमध्ये काम करणारे लोक त्यांचे वेतन न मिळाल्याबद्दल तक्रार करतात, तर काही अभिनेत्री त्याच्या चित्रपटात काम करणे टाळतात. हे सगळ एकीकडे सुरु असतानाच त्याच्या वादग्रस्त माहितीमुळे त्यांचे आत्मचरित्रही प्रकाशित होऊ शकत नाहीय. भाऊ शम्स सिद्दिकी त्याच्या नावाचा भलताच फायदा घेत आहे. तर दुसरीकडे नवाजच्या पत्नीनेदेखील त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. नवाजुद्दीनचे हे आयुष्य अगदी एखादी चित्रपटाच्या कथेपेक्षा काही कमी नाही.


नवाजुद्दिनची पत्नी आलिया हिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून, तिने नवाजुद्दिनवर अनेक गंभीर आरोपदेखील लावले आहेत. आलिया ही नवाजुद्दिनची बालपणीची मैत्रीण. तिचं खरं नाव अंजली पांडे आहे. एकाच गावात राहणाऱ्या अंजली आणि नवाजच्या प्रेमप्रकरणाला तिथूनच सुरुवात झालेली. काही वर्षांनी त्यांच्यात खटके उडू लागल्याने त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.


२०११ ला नवाजने शीबा नावाच्या मुलीशी लग्न केलं. मात्र हे लग्नही फार काळ टिकू शकलं नाही. २०१२ ला त्याने शीबाला घटस्फोट दिला. यावर बोलताना त्याने म्हंटलेले की, शीबा खूप चांगली होती. मात्र तिच्या भावामुळे आमच्या नात्यात वितुष्ट आले. यानंतर त्याने सह-अभिनेत्री सुजैनला डेट केले होते. अभिनेत्री निहारिका सिंगबरोबरही त्याचे नाव जोडले गेले होते. याच दरम्यान त्याने पुन्हा एकदा अंजलीची भेट घेतली आणि तिला थेट लग्नासाठी विचारले.


नवाजसोबत लग्न केल्यानंतर अंजली पांडेने आपले नाव बदलून आलिया सिद्दीकी असे केले. दरम्यान नवाजुद्दिनने त्याचे आत्मचरित्र प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. मात्र यात त्याने अनेक वादग्रस्त वक्तव्य आणि अनेक गौफ्यस्फोट केले. त्याच्या या पुस्तकावर काही अभिनेत्रींनी आक्षेप घेतल्यामुळे ते प्रसिद्ध होऊ शकले नाही. २०१७मध्ये पत्नी आलियाने नवाजवर ‘जासुसी’चा आरोप लावला होता. ती कुठे जाते, काय करते या सगळ्या गोष्टींवर तो लक्ष ठेवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतरही त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. मात्र त्या निव्वळ अफवा असल्याचे त्यावेळी त्यांनी म्हंटले होते.nawaz_1  H x W:


मात्र आता खुद्द अंजलीने नवाजला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना तिने म्हंटले की, लग्नाच्या एकावर्षानंतरच २०१० पासून माझ्या आणि नवाजच्या नात्यात समस्या होत्या. तेव्हापासून मी सर्व काही हाताळत संयमाने होते. पण आता सहन करणे कठीण झाले असल्याने मी हे पऊल उचलले आहे. नवाज आणि आलिया यांना २ अपत्ये असून त्यांच्या कस्टडीची मागणी आलिया म्हणजेच नवाजच्या पत्नीने केली आहे.


सध्या नवाजुद्दिन त्याच्या आई आणि भावासह त्याच्या मुळगावी उत्तर प्रदेश येथे पोहोचला असून, कोरोना संक्रमणामुळे त्याला १४ दिवस क्वारंटाइन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर तो आपला वाढदिवस तिथेच साजरा करणार आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.