तुझ्या भिकमांग्या देशासाठी काहीतरी कर : सुरेश रैना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2020
Total Views |

suresh raina_1  
 
 
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर खोऱ्यात गरजूंना मदत करण्यासाठी पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी गेला होता. मात्र तेथे गेल्यावर भारतीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने अफ्रिदीवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “सर्व लोकांनी त्यांच्या कामाशी संबंधित बोलायला हवे. विशेषतः जो देश भीक मागून जगत आहे त्यांनी. त्यामुळे तुमच्या अपयशी देशासाठी काहीतरी करा आणि काश्मीरचा मुद्दा सोडून द्या. काश्मिरी असल्याचा मला अभिमान आहे आणि तो नेहमी भारताचा अविभाज्य घटक राहणार आहे.” असे म्हणत सुरेश रैनाने अफ्रिदीला फटकारले आहे. कोरोनापेक्षा मोठा रोग मोदी यांच्या मनात आणि डोक्यात आहे. तो आजार धर्माचा आहे. त्या आजारावर ते सत्ता चालवत आहेत. आमच्या काश्मिरी लोकांवर अत्याचार करत आहे याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल, असे अफ्रिदीने म्हटलं होतं. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि शिखर धवन यांनी देखील आफ्रिदीला चांगलेच खडसावले.
 
 
 
हरभजनसिंग यानेदेखील त्याचा राग व्यक्त करत, “शाहिद आफ्रिदी माझ्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल जे काही बोलला, ते खूप चुकीचे आहे. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. शाहिद आफ्रिदी कोरोनाग्रस्तांसाठी काम करत होता. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने आम्ही शाहिदच्या संस्थेला मदतीचे आवाहन करत होतो. मात्र आता शाहीदचा आणि आमचा कोणताही संबंध नाही. मी २० वर्ष देशासाठी खेळलो आहे. मी भारतात जन्मलो आणि भारतातच अखेरचा श्वास घेईन. आज असो किंवा उद्या… देशाला माझी गरज भासली, तर देशासाठी बंदूक घेऊन सीमेवर जाणारा मी पहिला असेन. भारताविरोधात बोलायचा काहीही अधिकार नाही. त्याने त्याच्या देशात आणि मर्यादेत राहावे.” असा सल्ला दिला आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@