चीनी टिकटॉकवर भारतात बंदी घालण्याची मागणी!

    दिनांक  19-May-2020 15:55:20
|

TikTok_1  H x W


टिकटॉकचे रेटिंग ४.७ वरून थेट २ वर घसरले!


मुंबई : शॉर्ट व्हिडिओमेकिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकचे यूजर रेटिंग अचानक खाली घसरले. काही दिवसांपूर्वी प्ले स्टोअरवर टिकटॉकचे रेटिंग ४.७ होते आणि ते २ वर घसरले आहे. खरं तर, बरेच इंटरनेट युझर्स ‘टिकटॉकवर बंदी’च्या व्हर्च्युअल लढाईतही सामील झाले आहे. या वादाला यूट्यूब आणि टिकटॅक यांच्यात कोण चांगले आहे या प्रश्नापासून सुरुवात झालेली. बऱ्याच लोकांनी टिकटॉकला १ स्टार देत, भारतात यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.


टिकटॉक विरुद्ध युट्यूब या वादानंतर टिकटॉकवरील अनेक वादग्रस्त व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडीओंमधून धार्मिक तेढ, जातीवाचक हिंसा, महिलांवरील अत्याचार यांसारख्या गोष्टींचा मनोरंजनासाठी वापर करत त्या प्रकारांना उत्तेजन दिल्याचे समोर येत आहे. त्याच बरोबर या व्हिडिओमधून आता अश्लीलतेच्या सीमा पार केल्या जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. महिलांवर वाईट भाषेत टिप्पण्या, त्याच्यावरील होणाऱ्या अत्याचारांना मनोरंजनाच्या दृष्टीने बघणे यासारख्या गोष्टी यातून पसरविल्या जात आहेत.


फैजल सिद्दीकी नावाच्या एका तरुणाने महिलेवर असिड फेकण्याचा व्हिडिओ बनवला आणि तो टिकटॉकवर पोस्ट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी करण्यास सुरवात केली. तसेच व्हिडीओ बनवणाऱ्या फैजल सिद्दीकीला अटक करण्याची मागणीही केली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) टिकटॉक इंडियाला तातडीने हा व्हिडिओ हटवायला सांगितला असून, व्यक्तीविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश महिला आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनीही याबाबत टिक-टॉक इंडियाला पत्र पाठवले आहे. हे पत्र महिला आयोगाने टिक टॉक इंडियाचे अधिकारी अनुज भाटिया यांना लिहिले आहे.


‘टिकटॉकवर बंदी घालण्याच्या मोहीमेत आता अनेक कलाकार देखील सामील झाले आहेत. अभिनेते परेश रावल यांनी ‘बॅन टिकटॉक’ ट्विट करत यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.