दिल्लीतील निर्णय म्हणजे दिल्लीकरांचे मृत्युपत्रच ! : गौतम गंभीर

    दिनांक  19-May-2020 13:55:09
|

gambhir_1  H x
नवी दिल्ली : देशामध्ये लॉकडाऊन हा ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला. लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यामध्ये अनेक ठिकाणी सूट देण्यात आल्या असल्या तरी हे नियम फक्त ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनला सर्वाधिक लागू होतो. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील दिल्लीकरांना सुट देण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजप खासदार गौतम गंभीर याने यावर आक्षेप घेत ‘दिल्ली सरकारचा हा निर्णय म्हणजे दिल्लीकरांचे मृत्युपत्रच आहे’ अशी टीका केली आहे.
 
 
 
 
 
 
गंभीरने ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “जवळपास संपूर्ण दिल्ली एकत्र सुरू करणे हे दिल्लीकरांसाठीचे ‘डेट वॉरंट’सारखे ठरू शकते. दिल्ली सरकारने या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी विनंती मी करतो. एक चुकीचा निर्णय सर्वकाही संपवेल.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली. तर दुसरीकडे भाजप खासदार विजय गोयल यांनीदेखील यावर प्रतिक्रिया देत ‘या निर्णयामुळे कदाचित दिल्लीचे वूहन होऊ शकते.’ अशी भीती व्यक्त केली आहे. सध्या दिल्लीमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा १० हजारांवर पोहोचला असून १६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.