बोनी कपूर यांच्या घरी कोरोनाचा शिरकाव!

    दिनांक  19-May-2020 18:07:44
|

Boney kapoor_1  


घरकाम करणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण


मुंबई : बॉलिवूड चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यांच्या घराची देखरेख करणाऱ्या एका मदतनीसाला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. बोनी कपूर यांच्या घरी काम करणाऱ्या चरण साहू याचा कोरोना रिपोर्ट सकारात्मक आला आहे. चरण हा बोनी कपूर यांच्या अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील ग्रीन एकर्स सोसायटीमध्ये बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्या समवेत राहतो.


१६ मे रोजी त्याची तब्येत बिघडल्याने बोनी कपूर यांनी त्याला ताबडतोब तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आणि तेव्हापासून त्याला इतरांपासून ठेवले होते. चाचणी अहवाल सकारात्मक असल्याचे सिद्ध झाल्यावर बोनी कपूर यांनी सोसायटी आणि बीएमसीला याची माहिती दिली.


याविषयी सागताना बोनी कपूर म्हणाले की, मी, माझी मुलं आणि घरातले बाकीचे कर्मचारी ठीक आहेत. आणि आमच्यापैकी कोणालाही कोरोनाची लक्षणे दिसत नाहीयत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आमच्यापैकी कोणीही घराबाहेर पडले नाही. आम्हाला मदत केल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकार व बीएमसीचे आभार मानू इच्छितो. आम्ही आरोग्य कर्मचारी आणि बीएमसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत आहोत. चरण लवकरच बरे होईल आणि घरी परत येईल आणि आमच्याबरोबर असेल.’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.