कोरोनाग्रस्त आढळल्यास आता इमारत सील केली जाणार नाही!

    दिनांक  19-May-2020 11:54:46
|

seal buildings_1 &nb


इमारत सील करण्याबाबतच्या नियमांमध्ये पालिकेकडून बदल!मुंबई : कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर इमारत किंवा सोसायटी सील करण्याबाबतच्या नियमांमध्ये मुंबई महानगर पालिकेकडून बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार, आता एखादा कोरोनाबाधित रूग्ण इमारतीमध्ये असल्यास संपूर्ण इमारत किंवा सोसायटी सील न करता केवळ तो विशिष्ट मजला आणि सार्वजनिक भाग सील केला जाणार आहे. दरम्यान रूग्णामध्ये लक्षण असल्यास त्याला खाजगी किंवा सरकारी रूग्णालयामध्ये ठेवण्यात येईल. मात्र लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम क्वारंटीन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यासाठी रूग्णाच्या घरातील स्थिती पाहून हा नियम व्यक्तीपरत्वे बदलू शकतो. तर घरामध्ये मुबलक जागा, स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था असेल तर कोरोनाबाधितच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टला देखील होम क्वारंटीन केले जाईल. त्यासाठी एक सेल्फ डिक्लरेशन फॉर्म दिला जाणार आहे.


दरम्यान पालिकेकडून कोरोनाबाधित रूग्ण आढळलेल्या टोलेजंग इमारतीची विंग, मजला, लिफ्ट, लॉबी निर्जुंतुक केली जाईल. मात्र रूग्ण संख्या पाहून किती प्रमाणात इमारत सील केली जाईल त्याचा निर्णय पालिका अधिकारी घेणार आहेत. वस्ती अथवा इमारत अगदीच लहान जागेत असेल तर मात्र पूर्णपणे सील केले जाणारा आहे.


सध्या मुंबईमध्ये झपाट्याने कोरोन रूग्ण वाढत आहे. दरम्यान १८ मे पासून लागू करण्यात लॉकडाऊन ४ मध्ये केंद्र सरकारने काही नियमावली देऊन राज्य सरकारला रेड, ऑरेंज, ग्रीन झोन तसेच कंटेन्मेंट झोन ठरवण्याबाबतचेअधिकार दिले आहेत. त्यामुळे मुंबई शहरामध्ये आता रूग्णाची संख्या आणि त्याचा आरोग्य यंत्रणेवर येणार भार पाहता काही नियमांमध्ये बदल सूचवण्यात आले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.