‘कोरोना वॉरीयर्स’साठी आलिया भट्टकडून खास भेटवस्तू!

    दिनांक  19-May-2020 17:06:42
|

Alia bhatt_1  H


डॉक्टरांनी मानले आलियाचे आभार; चाहत्यांनीही केले कौतुक


मुंबई : कोरोना साथीच्या काळात अनेक कलाकार लोकांना मदत करत आहेत. आर्थिक मदतीसह कलाकार त्यांच्या पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे मदतीसाठी हात पुढे करत आहेत. अलीकडेच आलिया भट्टने तिच्या वतीने कोरोना वॉरियर्सला एक खास सरप्राईज पाठवले, यासाठी तिचे सगळ्यांकडून कौतुक केले जात आहे.


मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर श्रीपाद गंगापूरकर यांनी एक फोटो शेअर केला असून, त्यात चॉकलेट बार, गोड बन, ड्रिंक आणि काही स्नॅक्सह दिसत आहेत. या बॉक्समध्ये एक कौतुक करणारे पत्रदेखील ठेवण्यात आले होते. ‘लोकांना निरोगी व सुरक्षित ठेवण्यासाठी आपण जे काही करत आहात त्याबद्दल धन्यवाद. तुम्हीच खरे हिरो आहात’, असे या पत्रात लिहिले आहे.

'या गोड भेट वस्तूसाठी आलिया भट्ट यांचे आभार. कोरोना विषाणूच्या साथीच्या धोकादायक काळात तुमची भेट खूप खास आहे,’ असे म्हणत डॉ. श्रीपाद गंगापूरकर यांनी आलिया भट्टच्या या उपक्रमाबद्दल आभार मानले आहेत.


आलियाने कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या मुंबईतील सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही चॉकलेट्स पाठविली आहेत. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या अनोख्या पद्धतीमुळे चाहते आलियाचे कौतुक करत आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.