‘कोरोना'विषयी जनजागृती करणाऱ्या 'नियम' लघुपटाला पुरस्कार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2020
Total Views |
Niyam_1  H x W:

मुंबई : सुरछाया ऑनलाईन लघुपट महोत्सवात "नियम" या लघुपटाला 'सर्वोत्कृष्ट लघुपट' पुरस्कार मिळाला आहे. भारतीय महाक्रांती चित्रपट सेना,सुरछाया फिल्म सेंटर व असनिता फिल्म प्रॉडक्शन यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या सुरछाया ऑनलाईन लघुपट महोत्सवात हा पुरस्कार मिळाला आहे. लॉकडाऊन मुळे सध्या सगळे घरी आहेत. घरात राहून 'कोरोना' विषयी सामाजिक ऑनलाईन लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात एकूण ८५ लघुपटातून नगरच्या 'नियम' या लघुपटाने 'सर्वोत्कृष्ट लघुपट' म्हणून पुरस्कार मिळवला आहे.


'नियम' या लघुपटाचे लेखन- दिग्दर्शन आशिष निनगुरकर यांनी केले असून संकलन अभिषेक लगस यांचे आहे.सर्व नियम पाळून त्यांनी हा लघुपट घरात चित्रित केला आहे. या लघुपटात स्वरूप कासार,अशोक निनगुरकर व जयश्री निनगुरकर यांनी भूमिका केल्या आहेत.अनेक दर्जेदार लघुपटांमधून "नियम" या लघुपटाने परीक्षकांची विशेष पसंती मिळवली.


'नियम' हा लघुपट 'कोरोना' रोगाबद्दल जनजागृती करणारा आहे.'घरी रहा,सुरक्षित राहा.नियम पाळा,कोरोना टाळा' असा अनमोल संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे. काव्या ड्रीम मूव्हीज व सौ.किरण निनगुरकर यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. सुरछाया ऑनलाईन लघुपट महोत्सवात 'नियम' लघुपटाला 'सर्वोत्कृष्ट लघुपट' हा पुरस्कार मिळाल्याने काव्या ड्रीम मुव्हीजच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@