मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी!

    दिनांक  18-May-2020 12:27:56
|

MLA_1  H x W: 0विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडणार शपथविधी


मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी दुपारी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांसह विधान परिषदेवर निवड झालेल्या ९ आमदारांचा शपथविधी सोमवारी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडणार आहे. त्यानंतर कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत नियोजनानुसार २२ जूनपासून मुंबईत होणाऱ्या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनावर निर्णय घेतला जाणार आहे.


दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात पोहोचतील. १ वाजता मध्यवर्ती सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होणार आहे. १.४५ वाजता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची (विधानसभा आणि विधान परिषद) बैठक होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिवेशन नियोजित तारखेप्रमाणे घ्यायचे की काही काळ पुढे ढकलायचे याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.