कोरोना तपासणीनंतर अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी क्वारंटाइन!

    दिनांक  18-May-2020 16:26:57
|

nawaz_1  H x W:


आई आजारी असल्याने नवाजुद्दिन कुटुंबासमवेत उत्तरप्रदेशात दाखल


उत्तर प्रदेश : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या कुटुंबासमवेत त्याच्या मूळगावी उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाला आहे. कोरोना चाचणीनंतर त्याला आणि त्याच्या परिवाराला उत्तर प्रदेशमध्ये १४ दिवसांसाठी होम क्वारंटीन राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. ईदसाठी नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या कुटुंबासह मुझ्झफरनगर जिल्ह्यातील बुधाणा येथील त्याच्या मूळ घरी गेला असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी झळकल्यावर त्याच्या भावाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. नवाजुद्दिनच्या बहिणीचे काही दिवसांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर त्याच्या आईची तब्येत खालावल्याने तो गावी पोहोचल्याचे भाऊ शम्स सिद्दीकीने ट्विट करत सांगितले. दरम्यान नवाझ सह त्याच्या कुटुंबियांची मेडिकल स्क्रिनिंग आणि कोरोना चाचणी करण्यात आली आहे. हा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.





१५ मे ला नवाझुद्दीन उत्तर प्रदेशामध्ये त्याच्या घरी पोहचला. दरम्यान येत्या २५ मेपर्यंत त्याच्यासह कुटुंबाला होम क्वारंटीन राहण्याचे आदेश आहेत. पोलिसांकडून रितसर पास घेऊन खाजगी वाहनाने नवाझ त्याच्या आई, भाऊ आणि वहिनीसोबत उत्तर प्रदेशमध्ये पोहचला आहे. प्रवासादरम्यान २५ ठिकाणी त्याची मेडिकल स्क्रिनिंग केली गेली आहे. बुधाना पोलिस स्टेशनच्या ऑफिसरने नवाजुद्दीन सिद्दीकीच्या घरी जाऊन १४ दिवस क्वारंटीन राहण्याचे आदेश दिले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.