उद्योग करावा तर असा ! कोरोनाच्या संकटातही 'जिओ' मालामाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2020
Total Views |
JIO_2  H x W: 0





महिनाभरात एकूण ६० हजार कोटींची गुंतवणूक


मुंबई : कोरोना महामारीच्या संकटात जिथे बड्या उद्योगधंद्यांनी नांगी टाकली आहे, तिथेच मुकेश अंबानी यांनी मात्र आपल्या कंपनीला एक चुंबकीय ताकद दिली आहे. त्या जोरावर जगभरातील गुंतवणूकदारांसाठी पायघड्या घालण्याचे काम जिओ करत आहे. फेसबूक, सिल्वर लेक यांसह अन्य काही गुंतवणूकदारांनीही जिओवर विश्वास दर्शवला आहे. चौथ्या तिमाही निकालांत जिओने एकूण वार्षिक नफ्यात १७७.५ टक्के वाढ नोंदवली आहे. तिमाही निकालांचा विचार केल्यास ७२.७ टक्के म्हणजे एकूण २ हजार ३३१ रुपये वाढ झाली आहे. जिओने महिनाभरात चौथ्या गुंतवणूकदाराला आकर्षित केले आहे. 




GA_1  H x W: 0

६ हजार कोटींची नवी गुंतवणूक
'जनरल अटलांटीक' या कंपनीने जिओ प्लॅटफोर्ममध्ये १.३४ टक्क्यांच्या हिस्सेदारीसह ६ हजार ५८९.३८ कोटी इतकी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. एक खासगी इक्विटी कंपनी असलेल्या जनरल अटलांटीकचे मुख्यालय न्युयॉर्कमध्ये आहे. धोरणात्मक गुंतवणूक करत कंपन्यांना इक्विटी कॅपिटलद्वारे अर्थसहाय्य करणे हे या कंपनीचे प्रमुख उद्दीष्ट्य आहे.





JIO_4  H x W: 0


व्हिस्टा इक्विटीतर्फे ११ हजार कोटींची गुंतवणूक
खासगी इक्विटी फर्म व्हिस्टातर्फेही ११ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. कंपनीला जिओमध्ये २.३२ टक्के हिस्सेदारी मिळणार आहे.



JIO_5  H x W: 0




सिल्वर लेक - पाच हजार कोटी
तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारी अग्रगण्य कंपनी सिल्वर लेकतर्फे पाच हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. कंपनीत एकूण १.१५ टक्के हिस्सेदारी सिल्वर लेकची असणार आहे.



JIO_3  H x W: 0


फेसबूक - ४३ हजार कोटी
मार्क झुकरबर्गतर्फे ९.९९ टक्के गुंतवणूक हिस्सेदारीच्या मोबदल्यात एकूण ४३ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. फेसबूकतर्फे थेट जिओमध्ये गुंतवणूक करण्यात आली असल्याने येत्या काळात जिओ आणि फेसबूकच्या भागीदारीतून आणखी नवे उपक्रम राबवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकूण ६० हजार कोटींची गुंतवणूक
महिन्याभरात मोठ्या गुंतवणूकदारांमार्फत एकूण ६० हजार कोटींची गुंतवणूक आणण्यात मुकेश अंबानी यशस्वी झाले आहेत. जिओ अंतर्गत टेलिकॉम व्यवसायासह जिओ सावन, जिओ सिनेमा आदींसारख्या अन्य सेवाही ग्राहकांना मोफत दिल्या जातात.


@@AUTHORINFO_V1@@