विवेक समुहातर्फे संस्कृत संभाषण कार्यशाळेचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2020
Total Views |
 
vivek samuha _1 &nbs




मुंबई:
साप्ताहिक विवेक आणि विवेक मल्टीव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित उपक्रम 'संस्कृती वर्धन प्रकल्पाअंतर्गत दहा दिवसीय संस्कृत संभाषण या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
 
भारतीयांच्या अभिमानाचे स्थान म्हणजे भारतीय संस्कृती आणि तिचे मूळ म्हणजे संस्कृत भाषा. मूळ व्यवस्थित जाणले की नवीन निर्मिती करता येते. संस्कृतभाषेचे कोणतेही पूर्वज्ञान नसताना आपण ही भाषा सहज बोलू शकतो. याचा आनंद व प्रत्यय घेता यावा आणि लॉकडाऊनमध्ये उपयोगी असे नवीन काहीतरी शिकण्याकरीता हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे.



या कार्यशाळेसाठी सहा ते ऐंशी वर्ष वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येईल. दि.२१ ते ३० मे दरम्यान होणाऱ्या या कार्यशाळेत तीन अभ्यासक्रम शिकविले जाणार आहे. यात दुपारी १२ ते १ यावेळेत 'संस्कृत साहित्याच्या माध्यमामधून व्याकरण', संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ यावेळेत 'संस्कृत संभाषण भाग -१' आणि संध्याकाळी ७.३० ते ८.३० यावेळेत 'संस्कृत संभाषण भाग -२' या तीन अभ्यासक्रमांचा समावेश असेल.


ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या आपल्याला 'झूम' ऍपच्या माध्यमातून सहभागींना मार्गदर्शन केले जाईल. याकार्यशाळेसाठी प्रत्येकी ५०० रुपये शुल्क असून ४ जणांच्या कुटुंबासाठी १५०० रुपये शुल्क आहे. अधिक माहितीसाठी ९८६९१७०७१७ या नंबर वर गूगल पे किंवा पे टीएम द्वारा भरून त्याचा फोटो वरील क्रमांकावर व्हॉट्स्अॅप करा.  

अधिक माहितीसाठी लिंक वर क्लिक करा आणि नाव नोंदवा.
 


शुल्क NEFT द्वारा भरण्यासाठी :

Vivek Multivision Foundation
Bank of Maharashtra
Branch Prabhadevi
Account no. 60349483959
IFSC Code- MAHB0000318
@@AUTHORINFO_V1@@