'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज' आपली तीन वर्षांच्या नफ्याची अट शिथील करण्यास तयार

18 May 2020 20:28:47
Ashish Kumar_1  
 
 




'पार्क'च्या कॉन्फरन्समध्ये आशिष चौहान यांची माहिती



मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे देशासमोर उभ्या राहिलेल्या आजच्या परिस्थितीत उद्योजकांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. यातून सावरण्यासाठी 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज'तर्फे तीन वर्षांच्या नफ्याची अट शिथील करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. 'पार्क' (पॉलिसी अॅडव्होकेसी रिसर्च सेंटर) या 'विवेक समूहा'च्या कॉन्फरन्समध्ये बीएसईचे सीईओ आणि एमडी आशिष चौहान यांनी माहिती दिली.




सरकारने उद्यमींसमोर कर्ज किंवा इक्विटी हे दोन पर्याय ठेवले आहेत. आपली इक्विटी उभी करू पाहणाऱ्या कंपन्यांनाही सरकार मदत करणार आहे. या पार्श्वभूमीवर 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज'वर लिस्टिंग करणाऱ्यांसाठी अनेक बाबींवर पर्याय खुले करण्यात आले आहेत. मर्चंट बँकरच्या बाबतीही खर्च कमी करण्याचा प्रयत्न बीएससीतर्फे केला जाणार आहे. आशिष चौहान यांनी 'पार्क'च्या कॉन्फरन्समध्ये एमएसई सेक्टरसाठी अनेक योजनांची माहिती दिली. लघु उद्योग भारतीचे अनेक पदाधिकारीही यात सहभागी झाले होते. 'पार्क' या 'विवेक समूहा'च्या व्यासपीठातून आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिगमध्ये या विषयांवर विस्तृत चर्चा झाली.




Powered By Sangraha 9.0