झोमॅटोनंतर स्वीगीचाही कर्मचारी कपातीचा निर्णय!

18 May 2020 17:42:05

Swiggy_1  H x W



कोरोनाचा उद्योगाला फटका; १४% कर्मचारी कपात


मुंबई : ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्वीगीने कर्माचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक कारणाने कंपनीने ११०० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चौथाटप्पा सुरु होण्याच्या एक दिवस आगोदर स्वीगीने हा निर्णय घेतला. स्वीगीने जवळपास १४% कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी कपात करण्याचा निर्णय आमच्यासाठी अत्यंत वेदनादाई आहे. पण, नाईलाजाने तो आम्हाला घ्यावा लागतो आहे, असे स्वीगीने म्हटले आहे. दरम्यान, स्वीगी कंपनीच्या आगोदर झोमॅटो कंपनीनेही असाच निर्णय घेतला आहे. झोमॅटो कंपनीने १३% कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे.


स्वीगीने कर्मचाऱ्यांना सोमवारी एक इमेल पाठवला आहे. या इमेलमध्ये कंपीनीचे सीईओ श्रीहर्ष यांनी म्हटले आहे की, स्वीगीने आपली किचन सुविधा निश्चित किंवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या ईमेलमध्ये श्रीहर्ष यांनी म्हटले आहे की, आम्हाला सांगताना वाईट वाटते आहे की, ११०० कर्मचाऱ्यांना कंपनीपासून दूर करावे लागत आहे. कंपनीने प्रत्येक विभाग आणि श्रेणीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक शहरांतील प्रमुख कार्यालयांत कर्मचारी कपात केली आहे. कंपनीचा मनुष्यबळ विकास विभाग लवकरच पुढील निर्णयाबाबत माहिती देईल असेही श्रीहर्ष यांनी ईमेलमध्ये म्हटले आहे.


दरम्यान, कंपनीच्या सीईओंनी आपल्या इमेलमध्ये असेही म्हटले आहे की, कर्मचारी कपातीच्या निर्णयायाचा फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांना वित्तिय आणि करीअरशी संबंधीत सहकार्य केले जाईल. तसेच, जे कर्मचारी कंपनीच्या कर्मचारी कपातीत असतील त्यांना तीन महिन्यांचे वेतन दिले जाईल. याशिवाय कर्मचारी जितकी वर्षे कंपनीसोबत काम करत आहेत तेवढ्या महिन्यांचा पगार कर्मचाऱ्याला दिला जाईल. ही रक्कम नोटीस पीरियड दरम्यान दिल्या जाणाऱ्या वेतनापेक्षा वेगळी असेल.
Powered By Sangraha 9.0