सोने प्रतितोळा - ४७ हजार ८६५ रुपये : "दर कोरोनाच्या लसीवर अवलंबून"

18 May 2020 15:51:39
Gold_1  H x W:






सोन्याने मोडला सात वर्षांचा विक्रम



मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याला झळाळी आली आहे. सोन्याच्या दराने गेल्या सात वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. कोरोनाची लस जितक्या लवकर येईल, त्यानंतरच अर्थव्यवस्थेचे चक्र सुरळीत होईल, गुंतवणूकदार बाजारावर विश्वास ठेवतील, त्यानंतरच बाजारातील अनिश्चितता कमी होईल, असे मत फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केले आहेत. सोन्याचा सध्या वधारलेला दरही त्यावेळीच कमी होईल, असेही ते म्हणाले.

सकाळी ११ वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) दिवसभरात प्रति १० ग्रॅम १.०२ टक्क्यांनी वाढून ४७ हजार ८६५ रुपयांवर पोहोचला. तर चांदी तीन टक्क्यांनी वाढत प्रतिकिलो ४८ हजार २८० रुपयांवर पोहोचली आहे. सोमवारी सोन्याचे दर जागतिक पातळीवर एक टक्क्यांनी वधारले. अमेरिकेच्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे ढासळत्या अर्थव्यवस्थेचा परिणाम सोन्याच्या किंमतींवरही झाले आहेत.


यापूर्वी २०१२मध्ये वाढले होते दर

सोने १.१ टक्क्यांनी वधारत प्रतिऔस १,७६९ डॉलरवर पोहोचले. १२ ऑक्टोबर २०१२ रोजी सोने प्रतिऔस डॉलर १७६३.५१ वर पोहोचले होते. अमेरिकेत वायदेबाजारात सोने १ हजार ७७०.५० डॉलरवर बंद झाले होते. विश्लेषकांच्या मते, बाजारात गुंतवणूक वसुली मंदावली असल्याने सोन्याचे दर कमी होतील, अशी अपेक्षा आहे. शुक्रवारी अमेरिकेची आर्थिक आकडेवारी चिंताजनक होती.


फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यामते, अमेरिकेत आर्थिक सुधारणा पुढील वर्षांपासून आणखी परिणामकारक जाणवू शकतील. कोरोना विषाणूवर येणारी संभाव्य लस कधी बनेल त्यावर ही गोष्ट अवलंबून आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, बँक ऑफ इंग्लड व्याजदर कपातीसारख्या पर्यायांचा विचार करत आहे. कोरोनाचा प्रभाव हा तिथल्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे.



वर्षभरातील सोन्याचा आलेख

दिनांक                    दर प्रतितोळा (रुपयांत)

१ जानेवारी २०२०       ३९, ३२७ रुपये

१ फेब्रुवारी २०२०        ४१,३६० रुपये

२ मार्च, २०२०             ४२,१९३ रुपये

१ एप्रिल, २०२०            ४३,२४० रुपये

१ मे, २०२०                  ४५,५२७ रुपये

१८ मे, २०२०                ४७,८६५ रुपये






Powered By Sangraha 9.0