बेस्ट कर्मचाऱ्यांचा ‘कामबंद’ संप मागे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2020
Total Views |

BEST_1  H x W:



सुरक्षेच्या आश्वासनानंतर कर्मचारी कामावर हजर

मुंबई : कोरोनाचा मुंबईत वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे बेस्ट कर्मचारी आजपासून कामबंद आंदोलन पुकारणार होते. तसेच आपल्या मागण्याकंडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे 'घरी राहा, सुरक्षित राहा' च्या आधारावर हा बंद पुकारण्यात आला होता. मात्र बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी या कर्मचाऱ्यांशी बातचीत करुन त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. ६०% कर्मचारी कामावर रुजू झाले असल्याची माहिती महाव्यवस्थापकांनी दिली आहे.


बेस्ट सेवेतील १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही कर्मचारी दगावले आहेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना बेस्टमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन महाव्यवस्थापकांनी दिले आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना मास्क, हातमोजे या सारख्या अन्य गोष्टी देण्याचेही महामंडळाने मान्य केले. सद्य परिस्थिती मुंबईकरांची महत्त्वाची सेवा बंद करुन चालणार नाही, असे सांगितल्यानंतर सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.


सोमवारपासून कर्मचारी संपूर्ण टाळेबंदी पाळून ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ या सरकारच्या घोषणेचा अवलंब करणार असल्याचे समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले होते. मात्र काही मागण्या मान्य झाल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे ठरवले आहे.
@@AUTHORINFO_V1@@