संसर्गजन्य आजारावर ‘निसर्गोपचार’

    दिनांक  18-May-2020 21:14:48
|


ayurveda_1  H x


आपली प्राणशक्ती चांगली ठेवण्याचं काम हे पदार्थ करतात. आपला पारंपरिक आहार हा समतोल होता. आज जागतिकीकरणाच्या नावाखाली आपण आपली खाद्यसंस्कृती सोडली आणि परक्यांची स्वीकारली.


आज सगळ्यांना गरज आहे ती निसर्गाच्या जवळ जाण्याची म्हणजे
, निसर्गोपचाराची म्हणजे आयुर्वेदही आलंच. विनाऔषध उपचार यात आपल्या घरात परंपरेनी चालत आलेल्या मिसळणाच्या डब्याचं महत्त्वाचं स्थान आहे. फोडणीत घातल्या जाणार्‍या पदार्थांचा विचार केला तर मोहरी, जिरे, हिंग, हळद, मेथी हे प्रथम क्रमांकावर येतात आणि मग चवीनुसार किंवा पदार्थानुसार मसाले, मग ते परत प्रांतानुसार तिथल्या वातावरणानुरुप वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि हो फोडणीत कडिपत्याचं स्थानही मानाचं आहे आणि शक्यतो तो चिरुनच घालावा. शिवाय कोथिंबिर, खोबरं, शेंगदाणे आहेतच.


आपली प्राणशक्ती चांगली ठेवण्याचं काम हे पदार्थ करतात. आपला पारंपरिक आहार हा समतोल होता. आज जागतिकीकरणाच्या नावाखाली आपण आपली खाद्यसंस्कृती सोडली आणि परक्यांची स्वीकारली. त्यामुळे अन्नाप्रमाणेच आपलं राहणीमान बदललं आणि त्याचबरोबर अनेक आजारांनाही निमंत्रण दिले. पण
, आज परत हे सगळे स्वीकारण्याची, अंमलात आणायची गरज आहे. या पदार्थांचा आणि निसर्गातल्या इतर घटकांचा आपण विचार करणार आहोत.


निसर्गोपचार म्हणजे काय
?


आपण नेहमी या उपचारपद्धतीविषयी ऐकतो. पण हा प्रकार नेमका काय आहे
, त्याची माहिती नसते. आपण म्हणतो ना पिंडी ते ब्रह्मांडीयाचा अर्थ नेमका काय तर, निसर्ग आणि आपलं शरीर यात असलेले साम्य. ही सृष्टी पंचमहाभूतांनी बनली आहे आणि तिचा समतोल बिघडला की काय होतं, ते आज आपण सगळेच अनुभवतो आहोत. तेच शरीराबाबतही आहे. आपले शरीरही पंचमहाभूतांनी बनले आहे आणि शरीराचा समतोल बिघडला की अनेक आजारांना सामोरे जावे लागते. याचाच अर्थ निसर्गात जे आहे, ते सर्व आपल्यात आहे. मग त्याला सोडून आपण लांब गेलो की नुकसान होणारच. जसं पृथ्वीवर असलेल्या पाण्याची पातळी आणि आपल्या शरीरातील पातळी एकच आहे, तेच इतर घटकांच्या बाबत आहे. तात्पर्य, निसर्गात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्या उपयोगात आणणं म्हणजे निसर्गोपचारहोय. यामध्ये माती, वनस्पती, पाणी, अग्नी, ध्यान, योग , आहार, रंग, संगीत या सर्व गोष्टींचा समावेश होतो.


आजची निर्माण झालेली एकंदर परिस्थिती आणि भविष्यात पुढे उद्भवणार्‍या अशाच अनेक संकटांचा सामना हा आपल्या सगळ्यांनाच करायचा आहे. आज कोणी कितीही दाखवलं तरीही प्रत्येक जण मनातून घाबरला आहे
, खचला आहे. एकीकडे सतावणारी भविष्याची चिंता आणि अनेक शारीरिक आणि मानसिक त्रास यांना सांभाळत सगळे पुढे जात आहेत. सगळच अस्थिर आहे. पण, या सगळ्यामधून आपण स्वतःवर दृढ विश्वास ठेवून सहज मात करु शकतो आणि हे कसं सांगण्यासाठी मी आपल्या भेटीला येणार आहे लेखनाच्या माध्यमातून... तेव्हा, आज आपण अचानक येणार्‍या संसर्गजन्य आजाराचा सामना कसा करायचा, ते पाहूया. सगळ्याच गोष्टी या सगळ्यांना लागू होतात, असं नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार उपाययोजना करणे आवश्यक असते, पण आजार खूप प्रमाणात पसरला असेल, तर हे सर्व बघण्यासाठी वेळ मिळेलच असं नाही. मग आपल्याला सहजच उपलब्ध होईल आणि आपल्या पूर्वजांच्या अभ्यासानुसार आवळा, हळद आणि सुंठ किंवा काळी मिरी यांचा काढा प्राणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरु शकतो.


अमृतारिष्ट (गुळवेलीचा) काढा


आले
, लिंबू, काळ्या मनुका, ओवा, शेंदेलोण, पादेलोण, चिमूटभर हिंग यांचं पाचक, सीतोपलादी चूर्ण आणि आवळा यांचं मिश्रण, या गोष्टी उपयोगी आहेत. सरसकट कोरड्या खोकल्यात आपण गरम पाणी पितोच, पण एक मिठाचा खडा जिभेखाली ठेवला तर ढास थांबून कफ मोकळा होतो. बाळ हरडा किंवा डिंक तोंडात धरुन चघळल्यास कफ मोकळा होऊन बरे वाटू शकते. कोरड्या खोकल्यात साईखालील गोड दही दोन चमचे तीन दिवस खाल्ले तरी फरक पडतो. हळद, सुंठ, गुळाची गोळी चघळल्यास कफ मोकळा व्हायला मदत होते. आल्याचा रस आणि मध ही कोरड्या खोकल्यात उपयुक्त ठरेल. रोज पोट साफ ठेवणं आणि मानसिक संतुलन हेही महत्त्वाचे आहे.


ताप जास्त असेल तर उजव्या कानात कापूस घातल्यास ताप उतरतो. परिस्थिती खूपच गंभीर आहे आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर कापुराचा वास घेऊ शकतो. अमृतबिंदूची वाफ घेऊ शकतो आणि त्याहीपेक्षा अधिक त्रास होत असेल तर एका पातळ फडक्यावर लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून पसरवून ते त्याच कपड्याने झाकून छातीवर ठेवावे. त्यावर जाड कपडा ठेवून वरुन गरम पाण्याची पिशवी ठेवावी आणि वर ब्लँकेट घालावे आणि पंधरा मिनिटे ठेवावे. फुप्फुसात असलेले विषाणू नष्ट होण्यास मदत होते किंवा तळपायावर वरीलप्रमाणे ठेचलेल्या लसणाची पुरचुंडी घशात श्वासात नाकापर्यंत त्याचा दर्प जाईपर्यंत घासावी. त्याने फुप्फुसात श्वासनलिकेत असणारे घातक विषाणू नष्ट होऊ शकतात.


मानसिक ताण आणि त्यामुळे निर्माण होणारे काही शारीरिक त्रास हे एकमेकांना समजून घेऊन दूर करता येतात. प्रत्येकाला आधाराची गरज असते. आत्ताचा काळ हा भले शारीरिक अंतर ठेवून जगण्याचा जरी असला तरी मानसिक आधार
, दोन शब्द आपुलकीचे बोलून एकमेकांना आधार देण्याचा आहे. कारण, आपल्याला समाजात, माणसात राहायला आवडतं. 99 टक्के आजार हे आपल्या मानसिक अस्वास्थ्यामुळेच उद्भवतात कसे, हे आपण पुढे हळूहळू बघणारच आहोत. आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.

- सीता भिडे

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.