धक्कादायक ! राज्यातील १२७३ पोलीस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात

    दिनांक  18-May-2020 14:47:52
|


mumbai police_1 &nbs


मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व कर्तव्यात असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार
, गेल्या २४ तासांत ६७ पोलिस कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या १२७३ वर गेली आहे. या एकूण संख्येपैकी १३१ पोलिस अधिकारी आहेत तर ११४२ पोलिस कर्मचारी आहेत. राज्यात आतापर्यंत ११ पोलिस कर्मचार्‍यांचा बळी गेला आहे. यात एक दिलासादायक बाब म्हणजे २९१ पोलिस कर्मचारी बरे झाले आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ३३०५३ वर पोहोचली आहे.

 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.