नौदलातील डॉक्टरांच्या संकल्पनेतून साकारला 'नावरक्षक'

18 May 2020 15:47:18

navrakshak_1  H



मुंबई
: कोरोना विरोधातल्या लढ्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीचे योद्धे अविश्रांत योगदान देत आहेत. त्यांचा कोरोनाबाधित रुग्णांशी संपर्क येतो त्यामुळे या योध्यानांही कोरोना संसर्ग झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली. यावर उपाय म्हणून या आरोग्यदूतांना पीपीई म्हणजेच वैयक्तिक संरक्षण साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. पीपीईमुळे कोरोना विषाणूशी संपर्क होण्याचा धोका कमी होतो.



मात्र अनेक थर असलेला हा पीपीई किट परिधान करून कोरोनाबाधित रुग्णांवर ६ ते १२ तास उपचार करणे उष्ण आणि दमट हवामानात अधिक कठीण आहे. हेच लक्षात घेता भारतीय नौदलातील डॉ घोष यांनी आपल्या कल्पनेतून भारतीय वस्त्र साहित्यापासून तयार केलेल्या नौदलाच्या 'नावरक्षक पीपीई किट'मुळे आरोग्यदूतांमध्ये एक नवी आशा निर्माण झाली आहे. भारतातील हवामान आणि आरोग्य कर्मचाऱ्याच्या दृष्टीकोनातून हा पीपीई सूट तयार करण्यात आला आहे. मुंबईतल्या नौदल वैद्यकीय संस्थेच्या नाविन्यता विभागाचे नौदल वैद्यकीय तज्ञ असलेले घोष हे या कमी खर्चाच्या पीपीईच्या संकल्पनेमागचे शिल्पकार आहेत.



ते म्हणतात,"पीपीई किट तयार करताना पाणी,रक्त,रुग्णाच्या शरीरातले द्राव यांना प्रतिकार करण्याची क्षमता असणाऱ्या साहित्याचा विचार केला जातो.पीपीई वापरणाऱ्या व्यक्तीसाठी तो सुखकर किंवा त्याला हवेशीर कसा वाटेल यावर फारच कमी लक्ष पुरवले जाते. त्यामुळे मी नावरक्षक पीपीई सूट एका डॉक्टरने, डॉक्टरांचा हा त्रास विचारात घेऊन तयार केला", असल्याचे शल्यविशारद लेफ्टनंट कमांडर अर्णब घोष यांनी सांगितले. 'नावरक्षक' म्हणजे अद्भुत संरक्षक, याची दोन वैशिष्ट्ये आहेत, जास्तीत जास्त संरक्षण आणि जास्तीत जास्त हवेशीर.


पुढे ते म्हणतात, "एक डॉक्टर म्हणून मी सांगू इच्छितो की भारतीय बाजारात उपलब्ध असलेले बरेच पीपीई हवेशीर या पैलूकडे दुर्लक्ष करणारे आहे. कमी आणि दुय्यम दर्जाच्या पीपीईचा दीर्घकाळ वापर केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना थकवा जाणवतो. हवेशीर म्हणजे बाष्प जाऊ देण्याची आणि पाण्याला आत शिरण्यासाठी प्रतिबंध करण्याची त्या वस्त्राची क्षमता. एखाद्या पोशाखाची सुखकरता ही शरीरातले बाष्प बाहेर जाऊ देऊन शरीरावर द्रव जमा होऊ देण्यासाठी प्रतिबंध करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते.


कोरोनामुळे अचानक निर्माण झालेल्या पीपीइ किटच्या वाढत्या मागणीमुळे अनेक स्वयंसेवी संस्था आणि इतर संस्था पीपीई खरेदी करून त्याचा पुरवठाही करत आहेत. पुरवण्यात येत असलेल्या पीपीईचा दर्जा राखणे ही एक काळजीची बाब आहे. कमी दर्जाच्या पीपीईमुळे आरोग्य कर्मचाऱ्याचे आणखी नुकसान होऊ शकते कारण या पीपीई मुळे त्याला विषाणूपासून संरक्षण मिळत असल्याचा खोटा आभास होऊ शकतो. 'नावरक्षक' न विणलेले अत्याधुनिक दर्जाचे कापड वापरून, विशिष्ट जीएसएम आणि विशिष्ट तंत्राने शिवलेले आहेत.यावस्त्राचे वैशिष्ट म्हणजे मजबूत एकसमान बांधणी जी,द्रव, रक्त, शरीरातले द्राव यांना उत्तम प्रतिरोध करते.
Powered By Sangraha 9.0