कोरोना कहर (भाग-९) - कोरोनाविरोधी प्रभावी ‘आर्सेनिक अल्बम’

    दिनांक  18-May-2020 21:30:33
|


arsenic alb_1  


कोविड-१९च्या या आजारावर होमियोपॅथीक उपचार हे सर्वात गुणकारी व खात्रीचे आहेत, हे रुग्णांवर केलेल्या चाचण्यांनंतर आता सिद्धही झाले आहे.कोरोना व्हायरसचा हल्ला संपूर्ण जगावर झाला आणि संपूर्ण वैद्यकीय विश्व एकाएकी हादरले आणि तथाकथित प्रबळ वैद्यकीय संस्था कामाला लागल्या. सर्व प्रकारची औषधे
, प्रतिजैविके यांचा प्रयत्न करून झाला. पण, कोरोनाच्या संसर्गावर त्याचा सफल परिणाम झाला नाही व प्रबळम्हणणार्‍या वैद्यकीय शाखा निष्प्रभ ठरू लागल्या. अशावेळी एकच शाखा लोकांच्या मदतीला धावून आली, ती म्हणजे होमियोपॅथी!इतर वेळी होमियोपॅथीला शिव्या देणारे, नावे ठेवणारे, कमी लेखणारे लोकसुद्धा होमियोपॅथीच्या औषधांचा जादुई परिणाम पाहून अचंबित झाले आहेत. कोविड-१९च्या या आजारावर होमियोपॅथीक उपचार हे सर्वात गुणकारी व खात्रीचे आहेत, हे रुग्णांवर केलेल्या चाचण्यांनंतर आता सिद्धही झाले आहे. मी आणि माझ्या टीमनेसुद्धा या आजाराच्या लक्षणांवर संशोधन केले. त्यात काही औषधे ही या कोविड-१९मध्ये उपयुक्त ठरत असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यातील काही औषधे मी सांगू इच्छितो. परंतु, एक चेतावनीसुद्धा देतो की, नुसती लक्षणे वाचून डॉक्टरांच्या अनुमती व सल्ल्याशिवाय ही औषधे कधीही घेऊ नयेत.आर्सेनिक अल्बम (
Arsenic ALB)


आर्सेनिक अल्बमहे अतिशय खोलवर जाऊन काम करणारे औषध आहे. या औषधाचा परिणाम शरीराच्या सर्व संस्थांवर होत असतो. तरीही प्रामुख्याने याचा परिणाम हा मन, श्वसनसंस्था, पचनसंस्थेवर होताना दिसून येतो. हे औषध इतके खोलवर जाऊन कार्य करते की, कर्करोगावरसुद्धा आर्सेनिक अल्बमहे औषध प्रभावी ठरले आहे. या औषधाचा परिणाम रक्ताभिसरण संस्थेवर होतो. त्यामुळे पंडुरोगासारखे आजारही हे औषध बरे करते. शरीरातील आग आग होणे, जळजळ होणे, दम लागणे, थंडी वाजणे, सततची भोवळ येणे, चक्कर येणे, लक्षणांची तीव्रता अचानकपणे व जलदगतीने वाढणे, प्रमाणाच्या बाहेर असणारा अशक्तपणा, प्रचंड प्रमाणात असणारी मानसिक व शारीरिक चंचलता व अस्वस्थपणा या सर्व लक्षणांवर हे औषध परिणामकारक सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर वजन घटत जाणे, शरीर कृश होत जाणे हीसुद्धा काही लक्षणे आहेत. सर्व लक्षणे ठराविक वेळ व कालावधीत दिसून येतात, त्यास 'Periodicity' म्हणतात. मानसिकदृष्ट्या आर्सेनिकच्या रुग्णांत खालील लक्षणे दिसतात. (म्हणजे ज्यास आर्सेनिकलागू पडेल असा रुग्ण)अति संवेदनशीलता
, भयगंड, भीती, आजारी पडण्याची भीती, एखादा असाध्य रोग होण्याची भीती, प्रचंड प्रमाणात मृत्यूचे भय, संशयीवृत्त, मानसिक अस्वस्थता व चंचलता, श्वसनसंस्थेच्या निगडित लक्षणांमध्ये, दम लागणे, झोपताना त्रास होणे, बसूनच राहावे लागणे, तीव्र गंध, हसणे, जिने चढणे इत्यादींचा त्रास होतो. अस्थमा, एमफायसीमा, न्यूमोनियासदृश लक्षणे दिसून येतात.थंडी वाजून ताप येतो
, परंतु मोकळी हवा पाहिजे असते. तीव्र ताप येतो, खूप तहान लागते व प्रचंड थकवा येतो. कधीकधी जुलाब होतात इत्यादी. आर्सेनिक अल्बमबद्दल ही अत्यंत अल्प अशी माहिती मी आपणास दिली आहे. हे औषध आता आयुष मंत्रालयाने कोविड-१९च्या विषाणूवर प्रतिबंधात्मक औषध म्हणून घोषित केले आहे व याचा परिणाम अत्यंत चांगला होत असून या औषधामुळे व एकूणच होमियोपॅथीमुळे कोरोनाचे संकट लवकरच देशातून व जगातून नाहीसे होणार आहे, अशी आशा आहे.


(क्रमशः)

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.