तू तुझ्या मतदारसंघाकडे लक्ष दे ; निलेश राणे बरसले

    दिनांक  17-May-2020 14:59:29
|

nilesh rane_1  
मुंबई : सध्या भाजप नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामधील ट्विटरवरील वाकयुद्ध चांगलेच चर्चेत आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साखर उद्योग अडचणीत सापडला आहे, अशा आशयाचे पत्र लिहिले होते. यावर निलेश राणे यांनी, ‘साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले, यावर ऑडिट झाले पाहिजे’ असे म्हंटले होते. त्यानंतर शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटकरून या वाक्युद्धाला सुरुवात केली.
 
 
शरद पवारांच्या मागणीवरून निलेश राणे यांनी ट्विट केले होते की, “साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालेच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षोंवर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??” यावर रोहित पवार यांनीदेखील ट्विट केले की, “मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार यांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ आणि इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. शरद पवार प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदी त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी”
 
 
यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी रोहित पवारांना सल्ला देत ट्विट केले की, “मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही. कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी.” पुढे ते म्हणाले की, “हे रोहित पवार सारखे शेंबडे लुडबुड करत असतात. साखरेवर बोललो की हे अस्वस्थ का होतात कुणास ठाऊक?? महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे?? ह्या वांग्याला सांगा ते ठाकरे मुंबईत राहून नाय काय करू शकले हा तर अजून स्वतःची धुवायला शिकतोय.” अशी टीकादेखील त्यांनी केली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.